Chanakya Niti : नवऱ्याने ‘या’ 3 गोष्टी सांगितल्यावर पत्नीने कधीही देऊ नये नकार

| Updated on: Jan 03, 2025 | 5:25 PM

आचार्य चाणक्य यांना राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अर्थकारणाचे ज्ञान तर होतेच, पण जीवन सुखी करण्याचा मंत्रही त्यांच्याकडे होता. चाणक्य यांनी अशी अनेक धोरणे आखली, जी आजच्या आधुनिक युगातही प्रत्येक माणसाला उपयुक्त आहेत.

Chanakya Niti : नवऱ्याने या 3 गोष्टी सांगितल्यावर पत्नीने कधीही देऊ नये नकार
Follow us on

आचार्य चाणक्य यांची धोरणे देशभरातील लोकांमध्ये खूप प्रचलित आहेत. यामुळे लोकं आजतागायत त्यांच्या धोरणांचे पालन करतात. चाणक्य यांच्या धोरणांमध्ये स्त्री-पुरुषांविषयी अनेक नियम आणि गोष्टी आहेत, ज्यामुळे तुमचं नातं खूप घट्ट होऊ शकतं.

तुम्हाला जर जीवनात भरघोस यश मिळवायचे असेल तर आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचे अनुसरण करणे हा सर्वोत्तम मार्ग सांगितलं आहे. आचार्य चाणक्य यांना राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अर्थकारणाचे ज्ञान तर होतेच, पण जीवन सुखी करण्याचा मंत्रही त्यांच्याकडे होता. चाणक्य यांनी अशी अनेक धोरणे आखली, जी आजच्या आधुनिक युगातही प्रत्येक माणसाला उपयुक्त आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मते सुखी संसारात जर नवऱ्याने आपल्या पत्नीने कडे या 3 गोष्टी मागितल्या तर कधीही नाकारू नयेत. त्या तीन गोष्टी कोणत्या ?  चला जाणून घेऊयात

पतीचे दु:ख समजून घेऊन त्यांना त्यातून बाहेर काढा

चाणक्य यांच्या मते पती-पत्नीने त्यांच्या सुखी संसारात एकमेकांच्या सुख-दु:खाची काळजी घेतली पाहिजे. तसेच या वैवहिक आयुष्यात नवऱ्याच्या सर्व गोष्टींची काळजी घेणे हे पत्नीचे कर्तव्य आहे. जेव्हा तुमचा नवरा दु:खी असेल तेव्हा त्यांचे दुःख कमी केले पाहिजे. तसे न केल्याने तुमच्या वैवहिक जीवनात चांगले संबंध बिघडू शकतात. त्यामुळे पत्नीने तिच्या नवऱ्याचे दु:खाचे कारण शोधले पाहिजे आणि कोणत्याही किंमतीवर त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा.

पतीची प्रेमाची इच्छा पूर्ण करा

आचार्य चाणक्य यांच्या मते, या वैवाहिक जीवनात पती आणि पत्नी या दोघांचे आयुष्य सुधारण्यासाठी एकमेकांच्या इच्छा सांभाळणे खूप गरजेचे आहे. यातच पत्नीने नेहमी पतीवरील आपल्या प्रती असलेले प्रेम व्यक्त केले पाहिजे आणि पत्नीने पतीची प्रेमाची इच्छा पूर्ण केली पाहिजे. कारण यामुळे दोघांचे नटे संबंध घट्ट बनते आणि कोणतेही कलह- वाद होत नाही. जर दुसरीकडे नवरा-बायकोमध्ये प्रेम नसेल, एकमेकांविषयी आदर नसेल तेव्हा भांडणं होऊ लागतात आणि नाते बिघडते. जर तुमची बायकोही या गोष्टींची काळजी घेत असेल तर तिला कोणत्याही गोष्टीसाठी नकार न देणं हे तुमचं कर्तव्य बनतं.

वैवाहिक जीवनात सुरू असलेला कलह संपवा

लग्न हा जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तुम्हालाही तुमचं वैवाहिक जीवन सुखी पाहायचं असेल तर चाणक्य नीतीनुसार वैवाहिक जीवनात कधीही दुरावा येऊ न देणं हे पत्नीचं कर्तव्य आहे. मात्र आचार्य चाणक्य यांनीही आपल्या धोरणांमध्ये पतीनेही पत्नीशी असेच वागावे, असा उल्लेख केला आहे. जर याच मार्गाने तुमचे नाते चांगले चालले असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीला या इच्छेपासून कधीही वंचित ठेवू नये.