Chanakya Niti: आचार्या चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाल तर, कधीच अयोग्य मार्गावर जावं लागणार नाही
आचार्य चाणक्य यांना सांगितलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळातही योग्य सिद्ध होतात. अयोग्य मार्गावर कधी जाऊ नये यासाठी आचार्यांनी सांगितलेल्या यागोष्टी कायम लक्षात ठेवा.
1 / 5
आचार्य चाणक्य यांना आजही एक उत्तम लाईफकोच म्हणून पाहिले जाते. कारण त्यांच्या अनेक गोष्टी आजच्या काळातही अचूक असल्याचे सिद्ध होते. त्यांच्या अनेक गोष्टी योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगतात. लोकांना मार्गदर्शनपर ठरतात. आचार्य यांनी सांगितलेल्या गोष्टी येथे जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला वेळोवेळी योग्य दिशा दाखवतील.
2 / 5
आचार्य चाणक्य यांनी दानधर्माला फार महत्त्व दिले आहे. आचार्य म्हणायचे की, जगात जो माणूस भिकाऱ्याला दान देत नाहीत ते अत्यंत निर्दयी असतात. कारण गरिबी अधीच लोकांना जीवंतपणी मारते. अशा लोकांना गरीब आणि गरजू लोकांच्या वेदना ज्यांना समजत नाहीत ते आधीच मेले असतात.
3 / 5
आचार्यांचा असा विश्वास होता की या जगातील सर्वात मोठा शाप म्हणजे गरिबी आहे. जर तुम्ही गरीब असाल तर कष्ट करा आणि गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करा कारण या जगात निर्धन माणसाला कोणत्याही प्रकारचे सुख मिळवण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे मेहनत करा आणि परिस्थिती बदला.
4 / 5
आचार्यांचा असा विश्वास होता की, दुष्ट माणूस आणि नीच स्वभावाच्या व्यक्ती पासून लांब रहा. जो निरुपयोगी आणि व्यसनाधीन आहे. त्याला कोणतेही मित्र नसतात. तो फक्त त्याचे काम करण्यासाठी मित्र बनवतो. असे लोक इतरांचाही नाश करतात. त्यांच्याशी कोणताही संबंध न ठेवणे हेच तुमच्या हिताचे आहे.
5 / 5
आचार्य सांगतात की, जो गुरू तुमचे भविष्य घडवतो, योग्य-अयोग्य यातील फरक सांगतो, त्याचे स्थान देवापेक्षा मोठे असते. त्याच्या बद्दाल कधीही निंदा करू नये किंवा त्याच्याबद्दल चुकीचे काही ऐकू नये. अशा गुरूचा सदैव आदर करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. ज्यांच्यावर अशा गुरूचा हात असतो, त्यांची करिअरमध्ये खूप प्रगती होते.