मुंबई : वेळ कितीही कठीण असेल तरी हिमतीने समस्यांना सामोरे जावं, असं म्हटलं जातं (These Five Qualities Can Make Any Person Stronger ). पण, समस्या, अडचणींना हिमतीने तोंड देण्याचं कसब सर्वांमध्ये नसतं. त्यासाठी व्यक्तीमध्ये काही खास गुण असावे लागतात. आचार्य चाणक्य यांनीही चाणाक्य नितीमध्ये याबाबत काही विशेष गुणांचा उल्लेख केला आहे. जर हे गुण एखाद्या व्यक्तीने आपल्यात विकसित केले तर तो मोठमोठ्या समस्याही सहज सोडवू शकतो (Chanakya Niti Saying These Five Qualities Can Make Any Person Stronger To Face Difficulties).
1. आचार्य चाणक्य यांच्यामते ज्ञानी पुरुषसाठी कुठलाही वेळ ही कठीण नसते, कारण त्याला ह् माहिती असतं की कुठलीही वेळ ही नेहमीसाठी नसते. आज नाहीतर उद्या परिस्थिती पुन्हा बदलेल आणि ही वेळही त्या परिस्थितींसोबत निश्चितपणे बदलेल. त्यामुळे तो अनुकूल वेळेची प्रतिक्षा करतो आणि वर्तमानातील परिस्थितींमध्ये आपले कर्म करणे आणि ज्ञान संपादन करणे थांबवत नाही.
2. दुसरा गुण आहे संयम. अडचणीच्या समयी संयम हा कुठल्याही व्यक्तीचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जो व्यक्ती संयमी असेल तो कुठल्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतो. संयमी व्यक्ती विपरीत परिस्थितीतही आपल्या डोक्याचा पूर्ण वापर करतात आणि योग्य वेळेवर योग्य निर्णय घेऊ शकतात.
3. ज्या लोकांमध्ये धन जमा करण्याची सवय असते, ते कठीण काळातही परिस्थितींना सहज पार करतात. कारण धन तुमचा तो मित्र असतो जो कठीण काळात आव्हानांचा सामना करण्यात तुमची मदत करतो. त्यामुळे तुमची वेळ कितीही चांगली असेल तरीही धन जमा करा. जेणेकरुन जमवलेलं धन अडचणीच्या काळात कामात येऊ शकेल.
4. जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर योग्य निर्णय घेण्याची कला यायला हवी. कुठलीही व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत योग्य निर्णय तेव्हाच घेऊ शकते जेव्हा ती पूर्ण विचार करुन सर्वबाबी तपासून निर्णय घेतात. त्यामुळे कठीणातल्या कठीण परिस्थितही उत्साहात येऊन निर्णय घेऊ नका. कारण, उत्साहाच्या भरात व्यक्ती परिस्थिती समजू शकत नाही आणि त्याचा निर्णय चुकतो.
5. सर्वात महत्त्वाचं शस्त्र आहे आत्मविश्वास. जर आत्मविश्वास ढासळला तर कुठल्याही आव्हानाला सामोरे जाणं शक्य नाही. श्रीकृष्णानेही गीतेत सांगितलं की मानलं तर विजय आहे, मानलं तर पराजय आहे. त्यामुळे आपल्या क्षमता ओळखा आणि लोकांच्या बोलण्याचा परिणाम तुमच्यावर होऊ देऊ नका. जर आत्मविश्वास असेल तर जीवनात काहीही कठीण नाही.
Chanakya Niti | ‘या’ सात गोष्टी खाल्ल्यानंतरही तुम्ही पूजा-अर्चना करु शकताhttps://t.co/ZGoyk34OLq#ChanakyaNiti
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 16, 2021
Chanakya Niti Saying These Five Qualities Can Make Any Person Stronger To Face Difficulties
संबंधित बातम्या :
Chanakya Niti : मन स्थिर नसेल तर आयुष्यात असंख्य अडथळे, वाचा काय आहे सुखी जीवनाचा मंत्र
Chanakya Niti : कितीही संकट आलं तरी ‘या’ 3 गोष्टी विसरू नका, मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम होतील दूर