प्रत्येक आईवडिलांना आपल्याला मुलं असावीत असं वाटतं. या मुलांनी आपलं संगोपण करावं असं वाटतं. मुलं शिकली पाहिजे, सुसंस्कृत झाली पाहिजे, असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. त्यासाठी ते धडपडत असतात. पण अनेकदा तर मुलं मोठी झाल्यावर आपल्या आईवडिलांना विसरतात. आईवडिलांना सोडून एकटे राहतात. त्यामुळे अनेक मातापित्यांच्या आयुष्यात जीवनाच्या अखेरीस एकाकीपण येतं. त्यांना एकटेपणात आपलं आयुष्य घालवावं लागतं. असे आईवडील कधीच सुखी राहत नाहीत. आचार्य चाणक्य यांनी संतान कशी असावी यावर महत्त्वाचे विचार मांडले आहेत. कशाप्रकारच्या संतानामुळे आईवडील सुखी होतात हे सांगितलं आहे.
आर्य चाणक्य यांनी नीती शास्त्रात मानवी जीवनाच्या अनेक अंगांवर भाष्य केलं आहे. अत्यंत सखोल अभ्या केला आहे. त्यांची नीती आजही तेवढीच प्रासंगिक आहे. त्यांनी आपल्या नीतीत गुणवान संतानावर भाष्य केलं आहे. ज्या लोकांच्या कुटुंबात असे गुणवान मुलं असतात, ते अत्यंत भाग्यशाली असतात. असं कुटुंब आनंदाने भरलेलं असतं. ते कुटुंबाचा गौरव वाढवतात. कोणत्या प्रकारची मुलं आईवडिलांचा गौरव वाढवतात तेच जाणून घेऊया.
आज्ञाधारक मुलगा
ज्यांची संतान आज्ञाधारक असते आणि संस्कारी असते ते अत्यंत भाग्यशाली असतात. अशी मुलं आपल्या आईवडिलांसह संपूर्ण कुळाचं नाव रोशन करतात. अशा मुलांपासून केवळ आईवडीलच नव्हे तर कुटुंबातील सर्व सदस्यांचं आयुष्य सफल होतं.
संस्कारी मुलं
संस्कारी मुलं आईवडील आणि गुरुजनांचा नावलौकिक करतात. महिलांचा सन्मान करतात. चांगल्या वाईट कामाची त्यांना माहिती असते. अशी मुलं नेहमीच कुटुंबाचं नाव रोशन करतात. अशा लोकांना यश मिळतच पण समाजही त्यांचा प्रचंड सन्मान करतो.
शिक्षणाला महत्त्व देणारी
जी मुलं ज्ञानप्राप्तीसाठी नेहमीच अतूर असतात, त्यांच्यावर सरस्वती आणि लक्ष्मी देवी प्रसन्न असते असं आर्यचाणक्य म्हणतात. चांगलं शिक्षण घेऊन ही मुलं कुटुंब आणि खानदानीचं नाव रोशन करतात.
जाणीव असणारी मुलं
आर्य चाणक्यांच्या मते केवळ ज्ञान असून पुरेसं नाही. तर ज्ञानानंतरची जाणीवही झाली पाहिजे. ज्ञानाच्या बळावर समाजातील अंधकार दूर करण्याची जाणीव झाली पाहिजे. ज्या कुटुंबात ज्ञानी आणि जाणीव असलेली मुलं असतात ते आपल्या मेहनत आणि ज्ञानाच्या जोरावर सर्व काही मिळवतात. तसेच कुटुंबाचं नावही रोशन करतात.