मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) त्यांच्या रणनीतींसाठी ओळखले जायचे. त्यांनी माणसाच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या.चाणक्य (Chankaya)यांना राजकारणाची सखोल जाण होती, असे म्हणतात की त्यांनीच धोरण तयार केले. चाणक्याने आपल्या धोरणांमध्ये जीवनातील सत्याची सर्वांना जाणीव करून दिली आहे. चाणक्य नीतीमध्ये (Chankaya Niti) आई-वडिलांच्या नात्यापासून ते पती-पत्नीच्या नात्यापर्यंतची माहिती दिली आहे. असे सांगण्यात आले आहे की पती-पत्नीचे नाते खूप महत्वाचे आणि त्याच वेळी मजबूत असते, परंतु अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे दोघांचे नाते बिघडायला लागते आणि दुरावायला लागतात.तुमचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी आहेत. पण जर तुम्ही या गोष्टी लक्षात नाही घेतल्या तर घर युद्धभूमी झालीच म्हणून समजा. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
प्रत्येक नात्याचा पाया हा विश्वास असतो, जर काही कारणास्तव पती-पत्नीमध्ये विश्वास नसेल तर त्या नात्याला काही अर्थ राहात नाही. कारणास्तव दोघांमध्ये संशयाची भिंत निर्माण झाली तर तुमचे नाते तुटण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होते. अशा वेळी नात्यात कधीच शंका येऊ देऊ नका. पती पत्नीचे नाते काचे सारखे परदर्शी ठेवा
पती-पत्नीच्या नात्यात अहंकाराला स्थान नसावे. चाणक्याच्या नीतिशास्त्रानुसार पती-पत्नी दोघांनाही धर्मात समान स्थान आहे, त्यामुळे दोघांनीही एकमेकांचा आदर केला पाहिजे.
पती-पत्नीने कधीही एकमेकांशी खोटे बोलू नये, असे केले तर समजून घ्या की त्यांच्या नात्यात बचत करण्यासारखे काही नाही. कधी खोटं बोलत असाल तर एकमेकांशी बोलण्याची हिंमत दाखवा. प्रत्येकवाद कसा मिटेल या कडे भर द्या.
पती-पत्नीने ऑफिसपासून ते खासगीपर्यंतच्या सर्व गोष्टी एकमेकांना सांगायला हव्यात, जर तुम्ही काही लपवले तर त्यामुळे तुमचे नाते बिघडते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सांगण्याची सवय ठेवा.
विवाह केवळ विश्वासावर किंवा प्रेमावर आधारित नसून एकमेकांच्या आदरावरही आधारित असतो. अशा परिस्थितीत पती-पत्नी दोघांनीही प्रत्येक परिस्थितीत नेहमी एकमेकांचा आदर केला पाहिजे.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
Masik Durga Ashtami February 2022 : आज माघ दुर्गाष्टमी, जाणून घ्या तिचे महत्व आणि तिथी