मुंबई : 2021 चे पहिले चंद्रग्रहण काहीच तासांवर आलं आहे (Chandra Grahan 2021). ते 26 मे रोजी पूर्व भारतात दिसेल. कोलकातामध्ये राहणारे लोक या दृश्याचा आनंद घेऊ शकतील. हे ग्रहण दुपारी 3:15 च्या सुमारास सुरु होईल आणि संध्याकाळी 6:22 वाजता समाप्त होईल. रिपोर्टनुसार, सुपर मून केवळ 14 मिनिटे 30 सेकंदांपर्यंत असेल. चंद्रग्रहण कसे पहावे आणि कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल जाणून घ्या (Chandra Grahan 2021 How To Watch Eclipse And What Precautions Should Take)-
जर आपल्याला एखाद्या ग्रहणादरम्यान चंद्राची वैशिष्ट्ये पाहण्याची इच्छा असेल असेल तर आपल्यासाठी दूर्बिण सर्वात चांगला पर्याय आहे. जेव्हा पृथ्वीची छाया त्यावर पडते तेव्हा दुर्बिणीद्वारे आपण चंद्राच्या रंगातील बदल सहजपणे पाहू शकता. चंद्राच्या भोवतालच्या निळ्या रंगाचे पट्टे पाहण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ पूर्ण चंद्रग्रहणाच्या सुरुवातीला किंवा शेवटी चंद्राकडे पहाण्याचे सूचित करतात.
जर आपल्याला फायनर डिटेल्समद्ये चंद्र बघायचा असेल तर टेलीस्कोप हा आणखी एक चांगला पर्याय आहे. ग्रहण काळात चंद्राचे मोठे चित्र मिळविण्यासाठी आपण आपल्या डीएसएलआर कॅमेर्याशी टेलीस्कोप कनेक्ट करु शकता.
आपल्याला चंद्रग्रहणाचे फोटो क्लिक करण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता नाही. कोणताही कॅमेरा किंवा मोबाईल फोन कॅमेरा चंद्राचे फोटो घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
जर आपण लांब फोकल लेंथ शॉट्स किंवा लांब एक्सपोझर घेण्यासाठी उत्सुक असाल तर, एक ट्रायपॉड किंवा केबल रिलीझ सोबत ठेवा. दुर्बिण किंवा कॅमेरा स्थिर ठेवण्यास ते आपल्याला मदत करतात.
सर्वात सुंदर खगोलीय घटना – चंद्रग्रहणाच्या शूटिंग दरम्यान आपल्याला आपली बॅटरी संपायला नको. म्हणून, सर्व बैटरी चार्ज असल्याची खात्री करा आणि अतिरिक्त बॅटरी ठेवा.
एक फ्लॅशलाईट असणे महत्वाचे आहे. कारण हे आपल्याला आकाशातील अंधारात आपला मार्ग शोधण्यात मदत करते.
खगोलशास्त्रज्ञांच्या मते सूर्यग्रहणाच्या विपरीत चंद्रग्रहण पाहण्यास पूर्णपणे सुरक्षित आहे, याचा अर्थ असा आहे की आपल्याला पाहिजे तोपर्यंत आपण चंद्र पाहू शकता. पण, चंद्रग्रहण पाहाणे आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणामांबाबत अनेक मान्यता आहेत. काही प्रमुख मान्यता जाणून घेऊ –
• गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहणे टाळावे आणि घरातच राहावे, कारण मान्यता आहे की त्याचा बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो.
• यावेळी आपण स्वयंपाक करणे आणि अन्न ग्रहण करणे टाळावे.
• प्रवास टाळावा.
Chandra Grahan 2021 : या पूर्ण चंद्रग्रहणाला ‘सुपर ब्लड मून’का म्हणतात?https://t.co/lvnFboVgaU#SuperBloodMoon #LunarEclipse2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2021
Chandra Grahan 2021 How To Watch Eclipse And What Precautions Should Take
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Lunar Eclipse 2021 | या महिन्याच्या अखेरीस वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण, जाणून घ्या महत्त्वाची माहिती