चंद्रग्रहण
Image Credit source: Social Media
मुंबई : चंद्रग्रहणाची (Chandra Grahan 2023) प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो, कारण यादरम्यान आकाशात एक अनोखे दृश्य पाहायला मिळते. खगोलीय घटनांमध्ये रस असणाऱ्यांसाठी ग्रहण ही एखाद्या मोठ्या घटनेपेक्षा कमी नाही, पण दुसरीकडे धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. म्हणूनच ते उघड्या डोळ्यांनी पाहण्यास मनाई आहे. चंद्रग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते. यासोबतच मंदिरांचे दरवाजेही यावेळी बंद असतात, जाणून घ्या ग्रहण काळात हिंदू धर्मीय मान्यतेनुसार काय करावे आणि काय करू नये.
चंद्रग्रहण 2023 दरम्यान काय करू नये
- चंद्रग्रहणाच्या सुरुवातीपासून ते ग्रहण संपेपर्यंत कोणतेही शुभ कार्य करू नये.
- चंद्रग्रहणाच्या काळात खाणे आणि स्वयंपाक करणे दोन्ही निषिद्ध आहे.
- चंद्रग्रहणाच्या वेळी शारीरिक संबंध ठेवू नयेत.
- ग्रहणाच्या वेळी मूर्तीपूजा करू नये.
- ग्रहणाच्या वेळी मंदिराचे दरवाजे बंद करावेत.
- ग्रहणाच्या वेळी तुळशीच्या रोपाला हात लावू नये.
- ग्रहणाच्या वेळी झोपणे टाळावे.
- ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी चाकू, कात्री, सुई इत्यादी कोणत्याही प्रकारची धारदार वस्तू वापरू नये.
चंद्रग्रहण 2023 दरम्यान काय करावे
- चंद्रग्रहणाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी देवाची मनोभावे पूजा करावी.
- तुमच्या आवडत्या देवतेच्या मंत्रांचा जप करावा.
- चंद्राच्या मंत्रांचा जप करावा.
- चंद्रग्रहण संपल्यानंतर लगेच स्नान करावे.
- ग्रहण संपल्यानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे.
- ग्रहणाच्या वेळी महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र, रामरक्षा स्तोत्र इत्यादींचे पठण करणे शुभ असते.
- ग्रहण सुरू होण्याआधी गरोदर महिलांनी गेरुने आपल्या पोटावर स्वस्तिक बनवावे.
- ग्रहणाचे सुतक सुरू होण्यापूर्वीच सर्व खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये तुळशीदल टाका.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)