हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व दिले जाते. चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहणाची घटना पौर्णिमेच्या दिवशी घडते. चंद्रग्रहणाच्या लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्यावेळी चंद्र सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यावेळी चंद्रग्रहण मानले जाते. चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करत नाही. यंदाच्या वर्षामध्ये म्हणजेच 2025मध्ये एकुण 2 चंद्रग्रहण असणार आहे. चला तर जाणून घेऊया 2025मध्ये कोणत्या चंद्रग्रहण असणार आणि चंद्र ग्रहणाची वेळ काय आहे?
ज्योतिषशास्त्रानुसार, 2025मधील पहिले चंद्रग्रहण 14 मार्च म्हणजेच फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला आसणार आहे. या दिवशी चंद्रग्रहण सकाळी 9.29 वाजल्यापासून ते दुपारी 3.29 पर्यंत असणार आहे. मार्चमधील चंद्र ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या चंद्रग्रहणाच्या प्रभाव भारतावर पडणार नाही. मार्चमधील चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, दक्षिण उत्तर ध्रुव, ऑस्ट्रेलिया, आशियाचा काही भाग, अटलांटिक महासागर आणि युरोपमध्ये दिसणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार 2025मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा दिवस भाद्रपद पौर्णिमेचा असेल. या दिवशी रात्री 9.47 वाजल्यापासून ते रात्री 12.23 पर्यंत असणार आहे. सप्टेंबरमधील चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. सप्टेंबरमधील चंद्र ग्रहणाचा प्रभाव भारतामध्ये पडणार आहे. याशिवाय सप्टेंबरमधील चंद्रग्रहणाचे नियम भारतामध्ये देखील पाळले जाणार आहेत.
2025 मध्ये चंद्रग्रहणाव्यतिरिक्त दोन सूर्यग्रहण देखील असणार आहेत. 2025मधील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च रोजी असणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल, ज्याचा प्रभाव भारतामध्ये पडणार नाही. 2025मधील दुसरे सूर्यग्रहण 21 सप्टेंबरला होणार आहे. या सर्य ग्रहणाचा प्रभाव भारतामध्ये होणार नाही.