आचार्य चाणक्य हे प्राचीन काळातील महान मुत्सद्दी होते. आजही त्यांचे लिखित आचार लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात मानवी जीवनाचे पैलू अतिशय सखोलपणे स्पष्ट केले आहेत. ते जीवनात जे काही शिकले, ते ज्ञान आणि अनुभव चाणक्य नीतीमध्ये वर्णन केले आहे. आचार्य चाणक्य यांनी काही अत्यंत महत्वाच्या आणि फायद्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे देखील चाणक्य यांनी सांगितले आहे. त्यांच्या विचारांचे पालन केल्यास एखादी व्यक्ती आपल्या जीवनात सहज यश मिळवू शकते.
चाणक्य नीतीनुसार, रागीट व्यक्ती लवकर संयम गमावतात आणि विचार न करता बोलतात किंवा वागतात. अशा लोकांसोबत राहिल्याने भांडण होऊ शकते आणि तणावाचे वातावरण निर्माण होते, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे.
लोभी व्यक्ती नेहमी इतरांचे शोषण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांशी मैत्री करणे किंवा त्यांच्याशी व्यवसाय करणे हे अतिशय धोकादायक आहे.
आळशी व्यक्ती कधीही आपली कामं वेळेवर करत नाही. आणि त्याचं ओझं दुसऱ्यांवर टाकतात. अशा लोकांच्या संगतीत राहून तुम्हीदेखील आळशी बनू शकता. हे टाळायचं असेल तर अशा लोकांपासून चार हात दूरच रहा.
खोटं बोलणारे लोक कधीही सत्य बोलत नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. अशा लोकांशी मैत्री केल्याने तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते.
नकारात्मक व्यक्ती नेहमी नकारात्मक गोष्टींचा विचार करतात आणि अशाच गोष्टी बोलतात. अशा लोकांसोबत राहणारी व्यक्तीही नकारात्मक विचारसरणीची बळी ठरते.
ईर्ष्यावान लोक इतरांच्या यशाचा हेवा करतात आणि नेहमी त्यांचं नेमही वाईट चिंततात. अशा लोकांशी मैत्री केल्याने तुमच्या मनात इतर यशस्वी लोकांबद्दल मत्सर आणि द्वेष निर्माण होऊ शकतो.
टीका करणारे लोक नेहमी इतरांचे दोष शोधतात आणि त्यांची खिल्ली उडवतात. अशा लोकांशी मैत्री केल्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो, त्यामुळे विनाकारण नकारात्मक टीका करणाऱ्या व्यक्तीशी कधीच मैत्री करू नका. ज्या व्यक्ती तुमच्या भल्यासाठी तुमची चूक दाखवात, ते नेमही चांगलेच चिंततात. अशा टीकेला सकारात्मक टीका म्हणतात जी व्यक्तिमत्व विकासास मदत करते.
मूर्ख माणसाकडून शहाणपणाची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नसतो. अशा लोकांसोबत राहून तुमचा वेळ वाया जातो. त्यामुळे मूर्ख व्यक्तीसोबत राहून तुमचा वेळ कधीही वाया घालवू नका.