मुंबई : हिंदू धर्मग्रंथांमध्ये देवतांच्या पूजेला खूप महत्त्व दिले गेले आहे. योग्य प्रकारे पूजा केल्याने देवता प्रसन्न होतात आणि पत्रिकेतील ग्रहांचे अडथळेही दूर होतात. पण पूजेसोबत मंत्रांचा जप (Mantra Jaap) हाही एक उत्तम उपाय मानला गेला आहे. मान्यतेनुसार, मंत्र जपल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला शक्ती प्राप्त होते. हे मंत्र खूप चमत्कारिक आणि प्रभावी आहेत. मंत्रांचा खर्या मनाने जप केल्यास धन, आजार, गृहस्थी इत्यादी सर्व त्रास दूर होतात. जाणून घेऊया काही सिद्ध मंत्रांबद्दल, जे एखाद्या विशिष्ट समस्येमध्ये खूप प्रभावी मानले जातात.
जर तुमच्या जीवनात अनेकदा अडचणी येत असतील, प्रत्येक कामात अडथळे येत असतील आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही बजरंगबलीच्या मंत्राचा जप करावा. त्याच्या कृपेने शनि आणि मंगळाचे दोष दूर होतात आणि हनुमानजींच्या आशीर्वादाने सर्व संकटे दूर होतात.
मंत्र – ॐ ॐ ऐं भ्रीं हनुमते श्रीराम दूताय नम:।।
जर तुम्ही नवीन काम सुरू करत असाल आणि त्यात यश मिळवायचे असेल तर बाधा दूर करण्यासाठी गणपतीच्या मंत्राचा जप करा. असे केल्याने कार्यात यश आणि शुभ प्राप्ती होते. या मंत्राने कोणतेही काम सुरू करा, कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल.
मंत्र – ॐ गं गणपतये नमः।।
एखाद्याच्या जीवाला धोका असल्यास किंवा गंभीर आजार असल्यास भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने भीती दूर होते आणि जीवनातील संकटही टळते. असे मानले जाते की जे हा जप करतात त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत नाही.
मंत्र- ॐ त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्वारुकमिव बधननाममृत्योरमुक्षिया मृमृता ॥
जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर दररोज भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करा. याचा जप केल्याने सौभाग्य वाढते आणि मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान विष्णू प्रसन्न झाल्यावर सांसारिक सुख-समृद्धी वाढते.
मंत्र – ॐ नमो: भगवते वासुदेवाय।
जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल आणि लाख प्रयत्न करूनही सावरता येत नसेल तर भगवान शिवाच्या मंत्राचा जप करा. असे केल्याने कर्जही निघून जाते आणि पैशाची कमतरताही दूर होते. यासोबत मंगळवारी कर्जमुक्ती स्तोत्राचे पठण करावे.
मंत्र – ॐ रिनामुक्तेश्वर महादेवाय नमः।
जर तुम्ही ग्रहांच्या अडथळ्यांमुळे त्रस्त असाल आणि प्रगती होत नसेल तर याचे कारण कुंडलीतील सूर्याची कमजोरी असू शकते. सूर्यदेवाच्या मंत्राचा जप केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते. जर सूर्य बलवान असेल तर तुम्हाला कोणी जास्त त्रास देणार नाही. म्हणूनच दररोज सूर्याला अर्घ्य द्यावे आणि त्याच्या मंत्राचा जप करावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)