मुंबई, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Dwijapriya Sankashti Chaturthi) म्हणतात. या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची पूजा करण्याचा विधी आहे. तर फाल्गुन महिन्याची संकष्टी चतुर्थी 9 फेब्रुवारी 2023 रोजी येत आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. असे म्हणतात की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो कोणी श्री गणेशाची आराधना करतो आणि व्रत ठेवतो त्याच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. यासोबतच या दिवशी भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेक उपाय देखील करतात, ज्यामुळे त्यांना शुभ फळ मिळते. जाणून घेऊया द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तारीख 09 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 06.23 वाजता सुरू होईल आणि 10 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 07.58 वाजता चतुर्थी तिथी समाप्त होईल. अशा स्थितीत 9 फेब्रुवारी 2023 रोजी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे. 9 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्राची उपासना करण्याचा शुभ मुहूर्त रात्री 09:25 आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)