Chaturthi November 2023 : या तारखेला साजरी होणार गणाधिप संकष्टी चतुर्थी, अशी करा श्री गणेशाची आराधना

| Updated on: Nov 24, 2023 | 2:59 PM

Sankashta Chaturthi 2023 संकष्टी चतुर्थीच्या नावावरूनच कळू शकते की त्या चतुर्थीचे व्रत पाळल्याने माणसाचे सर्व त्रास दूर होतात. संकष्टी चतुर्थीला व्रत आणि पूजा केल्याने श्रीगणेश प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात. यावेळी गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्राची पूजा करण्याची पद्धत आहे.

Chaturthi November 2023 : या तारखेला साजरी होणार गणाधिप संकष्टी चतुर्थी, अशी करा श्री गणेशाची आराधना
संकष्टी चतुर्थी
Follow us on

मुंबई : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणाधिप संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2023) म्हणतात. या दिवशी गणपतीची आराधना केल्यास मार्गातील अडथळे दूर होतात अशा भार्मिक श्रद्धा आहे. यावेळी गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्राची पूजा करण्याची पद्धत आहे. याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यावरच पारण करून व्रत पूर्ण करतो. ज्योतिषी गराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया की, गणाधिप संकष्टी चतुर्थी कधी आहे? गणाधिप संकष्टी चतुर्थी पूजेचा शुभ काळ, शुभ योग आणि चंद्रोदयाची वेळ कोणती गे देखील जाणून घेऊया.

गणाधिप संकष्टी चतुर्थी 2023 तारीख आणि वेळ

पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गुरुवार, 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:24 पासून सुरू होईल. ही तारीख दुसऱ्या दिवशी शुक्रवार, 1 डिसेंबर रोजी दुपारी 03:31 वाजता संपेल. उदयतिथीच्या आधारे गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत ३० नोव्हेंबर रोजी पाळले जाईल कारण चतुर्थी तिथीचा चंद्रोदय ३० नोव्हेंबरलाच होत आहे.

 गणाधिप संकष्टी चतुर्थी 2023 शुभ मुहूर्त

यंदा गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. त्या दिवशी दुपारी 03:01 पासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, जो दुसऱ्या दिवशी सकाळी 06:56 पर्यंत राहील. शुभ योग सकाळपासून रात्री 08:15 पर्यंत आहे, तर शुक्ल योग रात्री 08:15 ते दुसऱ्या दिवशी रात्री 08:04 पर्यंत आहे.

हे सुद्धा वाचा

गणाधिप संकष्टी चतुर्थी 2023 पूजा मुहूर्त

सकाळी गणाधिप संकष्टी चतुर्थीची पूजा होईल. त्यावेळी शुभ योग राहील. त्या दिवशीच्या चोघडियाचा शुभ मुहूर्त सकाळी 06:55 ते 08:14 पर्यंत आहे. लाभ-उन्नती मुहूर्त दुपारी 12:10 ते 01:28 पर्यंत आणि अमृत-सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 01:28 ते 02:47 पर्यंत आहे.

गणाधिप संकष्टी चतुर्थी 2023 चंद्रोदय वेळ

30 नोव्हेंबर रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या रात्री 07:54 वाजता चंद्रोदय होईल. यावेळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून व्रत पूर्ण होईल. त्यानंतर पारणा होईल. संकष्टी चतुर्थीच्या नावावरूनच कळू शकते की त्या चतुर्थीचे व्रत पाळल्याने माणसाचे सर्व त्रास दूर होतात. संकष्टी चतुर्थीला व्रत आणि पूजा केल्याने श्रीगणेश प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)