विध्यार्थी दशेत बऱ्याच मुलांचे मन चंचल (Flickering) असते. याउलट काही इतके स्थिर आणि एकाग्र (concentration) असतात की, ते सतत अभ्यासात (study) मग्न असतात. चंचल मुलांना शिक्षणाच्या आणि अभ्यासाच्या नावाचासुद्धा तिटकारा असतो. त्याचे लक्ष अभ्यासात कधीच नसते. दुर्दैवाने कोरोना महामारीनंतर मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव आणखी वाढला आहे. परंतु काही वास्तु आणि ज्योतिषीय उपायांद्वारे (Astrology remedy) ते त्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित करता येणे शक्य आहे. त्यातील एक उपाय म्हणजे मुलांच्या खोलीत मेणबत्त्या लावणे. चला जाणून घेऊया मुलांच्या खोलीत मेणबत्त्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात जेणेकरून त्यांचे मन अभ्यासात गुंतून राहील. यासोबतच मुलांचे अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी इतर ज्योतिषीय उपाय जाणून घेऊया.
मुलांच्या खोलीच्या पूर्व, उत्तर-पूर्व किंवा दक्षिण भागात मेणबत्ती लावल्याने अभ्यासाबद्दल मुलांचं आकर्षण वाढतं, त्यांना अभ्यासात रस निर्माण होते. याशिवाय त्यांची बौद्धिक क्षमता देखील वाढते.
आपण जाणून घेतले की, मेणबत्ती लावण्याची योग्य दिशा किंवा ठिकाण कुठले आहे, पण काही ठिकाणे अशी आहेत जिथे मेणबत्ती चुकूनही लावू नये. उदाहरणार्थ, घराच्या उत्तर दिशेला मेणबत्ती लावल्याने पैसा कमविण्याच्या अडथळा येतो आणि घराच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. त्यामुळे घराच्या उत्तर कोपऱ्यात मेणबत्ती लावू नये. याशिवाय घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला मेणबत्ती ठेवू नये. येथे मेणबत्ती लावल्याने सदस्यांमध्ये अशांतता निर्माण होते आणि मनात घरातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होतो.
स्टडी टेबलचा आकार आयताकृती असावा. चौकोनी किंवा आयताकृती आकार काही लोकांना आकर्षक वाटू शकतो परंतु यामुळे अभ्यासात एकाग्रता कमी होते. शक्य असल्यास, टेबल अशा प्रकारे ठेवा की मुलाच्या तोंडासमोर भिंत येणार नाही. खुर्चीचा मागचा भागही मजबूत असल्याची खात्री करा.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)