Masik Shivratri 2024 : हरवलेलं प्रेम मिळणार… तयार राहा…मासिक शिवरात्रीला या 3 राशींचं नशिब बदलणार

| Updated on: Dec 18, 2024 | 5:08 PM

29 डिसेंबर 2024 रोजी मासिक शिवरात्री साजरी होत आहे. हा दिवस मिथुन, सिंह आणि मकर राशींसाठी अत्यंत शुभ आहे. सिंह राशींना व्यवसायात यश, मकर राशींना आर्थिक लाभ आणि मिथुन राशींना घरात गुंतवणूक करण्याचा योग आहे. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करून मनोकामना पूर्ण करा. या दिवसाचा शुभ मुहूर्त आणि अशुभ मुहूर्त देखील जाणून घ्या.

Masik Shivratri 2024 : हरवलेलं प्रेम मिळणार... तयार राहा...मासिक शिवरात्रीला या 3 राशींचं नशिब बदलणार
maha shivratra
Follow us on

मासिक शिवरात्रीचा दिवस अत्यंत विशेष मानला जातो. हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी भक्त व्रत ठेवतात. पूजा अर्चा करतात. आजच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्यानंतर पटकन प्रसन्न होतो. त्यामुळे मनपसंत वर मिळतो. हा दिवस तीन राशींसाठी अत्यंत कल्याणकारी आहे. या कोणत्या तीन राशी आहेत? त्यांना कोणता फायदा होणार आहे? याचीच आता आपण माहिती घेणार आहोत.

मासिक शिवरात्री कधी आहे?

हिंदू पंचागानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या तिथीची सुरुवात 29 डिसेंबर रोजी रात्री 3 वाजून 32 मिनिटाने होईल. या तिथीची समाप्ती 30 डिसेबर रोजी पहाटे 4 वाजून 1 मिनिटाने होणार आहे. मासिक शिवरात्रीला निशा काळात शिव पार्वतीची पूजा केली पाहिजे. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी पौष महिन्याची शिवरात्री साजरी केली जाईल. यावेळची मासिक शिवरात्री अत्यंत दुर्मीळ असल्याचं सांगितलं जात आहे. या मासिक शिवरात्रीमुळे तीन राशींचं भाग्य बदलणार असल्याचं सांगितलं जातं. मिथुन, सिंह आणि मकर या त्या तीन राशी आहेत. या तीन राशीवाल्यांच्या भाग्यात काय होणार आहे? हेच आपण पाहणार आहोत.

सिंह –

सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ मिळणार आहे. त्यांचा बिझनेस दुप्पट वेगाने वाढणार आहे. तसेच त्यांचं हरवलेलं प्रेमही त्यांना मिळणार आहे.

मकर –

या राशीच्या लोकांना मासिक शिवरात्रीच्या दिवशी मोठा धनलाभ होणार आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ होणार आहे. तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग त्यांना मिळणार आहेत. या दिवशी महादेवाचा काळे तीळ आणि गंगाजलाने अभिषेक करा.

मिथुन –

या राशीच्या लोकांसाठी मासिक शिवरात्रीचा दिवस अत्यंत मंगलकारी ठरणार आहे. हे लोक घर, वाहन यात गुंतवणूक करतील. तसेच यांच्यावर भगवान महादेवाची कृपा राहील.

शुभ मुहूर्त

सूर्योदय – पहाटे 06.55

राहुकाळ – सकाळी 10.51 पासून दुपारी 12.09 वा.

ब्रह्म मुहूर्त – पहाटे 05.07 पासून ते 06.01 वाजेपर्यंत

अभिजीत मुहूर्त – सकाळी 11.49 वाजल्यापासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत

अशुभ मुहूर्त – सकाळी 09.01 पासून ते 09.43 वाजेपर्यंत.