हिंदू धर्मात माता लक्ष्मीला (Mata lakshmi) संपत्तीची देवी मानले जाते. असे मानले जाते की, ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही. आयुष्य सुखकर असते. म्हणूनच असं मानलं जातं की धन कमविण्यासाठी देवी लक्ष्मीचीही कृपा असणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आलेले आहे. तसेच माता लक्ष्मीची कृपा होण्याआधी काही संकेत मिळतात. ज्यावरून लक्ष्मीची कृपा होणार म्हणजेच धनलाभ (Dhanlabh Joga) होणार असे कळते. ज्योतिषशास्त्रानुसार माता लक्ष्मी येण्यापूर्वी काही ना काही संकेत नक्कीच देते. अनेकद स्वप्नातसुद्धा संकेत मिळतात. हे संकेत समजून घेतल्यास आपण अधिक प्रयत्नशील होऊन त्या देवीशेने पाऊलं उचलू शकतो. जाणून घेऊया माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत देणार्या अशा स्वप्नांबद्दल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)