Dhanteras 2024 : धनत्रयोदशीला करा हे खास उपाय, ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक समस्या होतील दूर

| Updated on: Oct 24, 2024 | 7:02 PM

दिवाळीचं शुभ पर्व आता जवळ आलं आहे. बाजारात खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. तसेच धनतेरस, लक्ष्मीपूजन या दिवशी आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ज्योतिषीय तोडग्यांकडे पाहिलं जातं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशी या दिवशी चार तोडगे सांगण्यात आले आहेत. चला जाणून घेऊयात त्याबाबत

Dhanteras 2024 : धनत्रयोदशीला करा हे खास उपाय, ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक समस्या होतील दूर
Follow us on

अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी हे शुभ पर्व असते. या दिवशी मृत्यू देवता यमराज, धनदेवता कुबेर, देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. या वर्षी धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला मंगळवारी येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे या दिवसाचं खास महत्त्व आहे. धनत्रयोदशीला विकत घेतलेल्या स्थायी अस्थायी संपत्तीत 13 पटीने वाढ होते. त्यामुळे या दिवशी सोनं, चांदी, भांडी, वाहने, जागा, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर वस्तू खरेदी केल्या जातात. धनत्रयोदशीला धण्याचं महत्त्व आहे. धणं हे धनाचं प्रतिक मानलं जातं. दुसरीकडे, धनत्रयोदशीला मृत्यूदेवता यमाची पूजा केली जाते. संध्याकाळी दक्षिण दिशेला चारमुखी यमदीपक लावला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, दक्षिण ही यमाची दिशा आहे. त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून या दिवशी मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. या दिवशी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहे. त्यामुळे आर्थिक समस्येवर तोडगा निघू शकतो. देवी लक्ष्मीचा कृपाशिर्वाद व्हावा म्हणून चार उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केले तर देवी लक्ष्मीची कृपा राहते असं सांगितलं जाते.

देवी लक्ष्मीची कृपाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी ज्योतिषीय उपाय

देवी लक्ष्मीला लाल रंगाचं वस्त्र अर्पण करावं. लाल रंग हं सौभाग्याचं प्रतिक मानलं जातं. यामुळे देवीची विशेष कृपा राहते. तसेच आर्थिक समस्येवर तोडगा निघतो.

देवी लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करावं. हे देवीचं आवडतं फूल असून ती कमळावर विराजमान आहे. त्यामुळे देवी प्रसन्न् होते, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.

धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णुंची पूजा करावी. भगवान विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते. आर्थिक समस्येतून मार्ग सापडतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

देवी लक्ष्मीला खीर नैवेद्य खूपच प्रिय आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीला खीरेचा भोग लावावा. त्यामुळे देवी लक्ष्मीचा कृपाशिर्वाद राहतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)