दिवाळी
Image Credit source: Social Media
मुंबई, वर्षभर ज्या सणाची वाट पहिली जाते तो दिवाळीचा सण (Diwali 2022) जवळ आला आहे. हा पाच दिवसांच्या या सणाची सुरवात धनत्रयोदशीपासून (Dhantairas 2022) होते. या काळात लक्ष्मीच्या पूजेला (Diwali Laxmi Pooja) विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची विधिवत पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. दीपावली पूजेसोबत ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. ब्रह्म मुहूर्त आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी हे उपाय केल्यास लक्ष्मी देवीची कृपा आयुष्यभर राहते. स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे अशी मराठीत म्हणंच आहे. याशिवाय जिथे महिलांचा आदर केला जातो. तेथे धनाची देवी लक्ष्मी वास करते. जाणून घेऊया दिवाळीत करायच्या काही उपायांबद्दल.
- दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी, फुले आणि दिव्यांनी आपली घरे सजवा. देवी लक्ष्मीच्या कायमस्वरूपी निवासासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा.
- दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी तुमच्या घरी यावी असे तुम्हाला वाटत असेल तर ब्रह्म मुहूर्तावर उठा. घराच्या बाहेरची स्वच्छता करा. चप्पल मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवू नका.
- ब्रह्म मुहूर्तावर उठून घरातील पूजेचे ठिकाण व्यवस्थित स्वच्छ करावे. असे केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर चांदीच्या भांड्यात कापूर जाळून लक्ष्मीची आरती करावी. असे केल्याने व्यक्तीला आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.
- दीपावलीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा. असे केल्याने फायदा होईल.
- दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला पूजेच्या वेळी कच्च्या हरभऱ्याची डाळ अर्पण करा. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.
- दिवाळी अमावस्येला येते. या दिवशी घराच्या कोपऱ्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील गरिबी दूर होते. यासोबतच भूत-प्रेतांशी संबंधित अडथळे दूर होतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)