मुंबई, दिवाळीमध्ये (Diwali 2022) लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. पाच दिवसांच्या या सणात पाच महत्त्वाचे दिवस साजरे होतात, जे आपण पंचपर्व म्हणून साजरे करतो. हिंदू धर्मात या पाच सणांना खूप महत्त्व आहे. दिवाळीचा सण आपल्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन येतो. प्रकाशाच्या या सणाची प्रत्त्येकच जण आतुरतेने वाट पाहत असतो. धनत्रयोदशी यापैकी प्रथम साजरी केली जाते. यानंतर नरकचतुर्दशी व दीपावली, त्यानंतर गोवर्धन पूजा आणि शेवटी भाऊबीज. दिवाळीच्या रात्री शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासाठी पूजेचे विशेष साहित्य लागतात. ज्याची व्यवस्था वेळेआधी करणे आवश्यक आहे. या वर्षीच्या दिवाळी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता असेल ते जाणून घेऊया.
अमावस्या 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05.27 वाजता सुरू होईल
अमावस्या तिथी 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.18 वाजता समाप्त होईल
दीपाली पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06.44 ते 08.05 पर्यंत
दीपावली 24 ऑक्टोबरला आहे, तर दुसऱ्या दिवशी होणारी गोवर्धन पूजा 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असल्यामुळे 26 ऑक्टोबरला होणार आहे. 2007 नंतर दुसऱ्यांदा असे होणार आहे. दिवाळीच्या दिवशी सकाळी चतुर्दशी असेल आणि दुपारी अमावस्या सुरू होईल.
धूप, अगरबत्ती, कापूर, केसर, चंदन, अक्षत, जानवे 5, कापसाचे वस्त्र, अबीर, गुलाल, बुक्का, सिंदूर, सुपारी, विड्याचे पानं, आंब्याचे पानं, दुर्वा, अत्तराची बाटली, प्रसादासाठी पेढे, पाच प्रकारची फळं, कमळाचे फुल, दूध, दही, तूप, मध, साखर याचे पंचामृत. चांदीचे नाणे, नारळ, लक्ष्मी देवीची मूर्ती, गणपतीची मूर्ती, लाल वस्त्र, पेन, हिशेबाची वही, तांब्याचा कलश नाणी, लक्ष्मीपूजनाचे चित्र, श्री. यंत्र चित्र हे पूजेचे साहित्य आवश्यक आहे.