Diwali 2023 : या शुभ योगात साजरी होत आहे दिवाळी, लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

| Updated on: Nov 12, 2023 | 2:28 PM

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लाकडी चौरंगावर लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवावी. देवा समोर तेलाचा आणि तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर कलश स्थापित केल्यानंतर प्रथम गणेशाची पूजा करावी. सर्वप्रथम गणपती समोर विड्याचे पान, सुपारी आणि नाणे ठेवावे. ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा.

Diwali 2023 : या शुभ योगात साजरी होत आहे दिवाळी, लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
दिवाळी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आज, रविवारी 12 नोव्हेंबरला देशभरात दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा होत आहे. यंदाची दिवाळी सौभाग्य योग आणि स्वाती नक्षत्रात आहे. या सुंदर योगायोगात दिवाळीचे लक्ष्मीपूजन होणार आहे, जे तुमच्यासाठी शुभ आणि लाभदायक असेल. आज पूजेची वेळ संध्याकाळची आहे. कार्तिक अमावस्येला प्रदोष काळात दिवाळीची पूजा करणे शुभ आहे. याशिवाय निशिता काळातही लक्ष्मीपूजन (Lakshmi Puja Muhurat) करता येते. दिवाळीत लक्ष्मी मंत्रांचा जप केल्याने धनसंपत्ती वाढते. जोतिश शास्त्रातले तज्ञ पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घ्या दिवाळीचा शुभ मुहूर्त, लक्ष्मीपूजन पद्धत, पूजा साहित्य, मंत्र, नैवेद्य, आरती या बद्दलची माहिती.

दिवाळी 2023 शुभ काळ

कार्तिक अमावस्या तिथीचा प्रारंभ: आज, दुपारी 02:44 पासून
कार्तिक अमावस्या तिथीची समाप्ती: उद्या, दुपारी 02:56 वाजता
दिवाळी लक्ष्मी पूजनाचा संध्याकाळचा मुहूर्त: संध्याकाळी 05:39 ते 07:35
दिवाळी लक्ष्मी पूजन रात्रीची वेळ: रात्री 11:39 ते 12:32
स्वाती नक्षत्र: आज, सकाळ ते उद्या पहाटे 02:51 पर्यंत.
सौभाग्य योग: आज दुपारी 04:25 ते उद्या दुपारी 03:23 पर्यंत

लक्ष्मी पूजनासाठी पूर्व तयारी

लक्ष्मीची मूर्ती, गणपती, अक्षत, शेंदूर, कुंकू, हळद, चंदन, लाल फुले, कमळ आणि गुलाबाची फुले, हार, पाच प्रकारची फळे, सुपारी, विड्याची पाने, लाङ्या, बताशा, पेठे, मध, अत्तर, गंगा जल, दूध, दही, तेल, शुद्ध तूप,लाडू, मौली धागा, कलश, पितळेचा दिवा, पणत्या, कापसाची वात,  दुर्वा, लाकडी चौरंग, आंब्याची पाने,  आसनासाठी लाल किंवा पिवळे कापड, एक नारळ, लक्ष्मी आणि गणेशाची सोन्याची किंवा चांदीची नाणी, धणे इ.

हे सुद्धा वाचा

लक्ष्मी देवीचा मंत्र

ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्री ह्रीं श्री ओम महालक्ष्मी नमः।

लक्ष्मी पूजनाचा विधी

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लाकडी चौरंगावर लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवावी. देवा समोर तेलाचा आणि तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर कलश स्थापित केल्यानंतर प्रथम गणेशाची पूजा करावी. सर्वप्रथम गणपती समोर विड्याचे पान, सुपारी आणि नाणे ठेवावे. ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा.

यानंतर लक्ष्मीला पंचामृताने अभिषेक करावा. स्वच्छ कापडाने पुसून ती चौरंगावर ताम्हणात ठेवावी. देवीला चंदननाचा टिळा लावावा, हळद कुंकू वाहावे. कमळाचे फुल वाहावे कमळाचे फुल नसल्यास लाल फुल वाहावे.

एक मोठा अखंड तेलाचा दिवा लावा, जो रात्रभर जळत राहावा.  धनधान्य आणि संपत्तीसाठी श्री सुक्तम किंवा कनकधारा स्तोत्राचा पाठ करा. कापूर किंवा तुपाच्या दिव्याने गणेश आणि देवी लक्ष्मीची आरती करा. त्यानंतर लक्ष्मीला संपत्ती, सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करा.  घरातील महत्त्वाच्या ठिकाणी पणत्या लावाव्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)