दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा… लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता हा सण आनंद, उत्साह घेऊन येतो. धनत्रयोदशी हादेखील यातील एक प्रमुख दिवस असून देशभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या शुभ दिवशी लोक विविध धार्मिक कार्यात सहभागी होतात. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर, धन्वंतरी आणि लक्ष्मीमातेची पूजा केली जाते. या दिवशी लोक घराबाहेर दिवे, पणत्या प्रज्वलित करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, दागिने आणि भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी धने आणि गूळ याचाही नैवेद्य दाखवला जातो.
दरवर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, धनत्रयोदशी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. यावेळी मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी होणार आहे.
धनत्रयोदशी शुभ मुहूर्त (Dhanteras 2024 Shubh Muhurat)
धनत्रयोदशीची तिथी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 31 मिनिटांनी सुरू होणार असून 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल.
धनत्रयोदशी खरेदीचा मुहूर्त
यावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग तयार होत आहे, यावेळी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
पहिला मुहूर्त- 29 ऑक्टोबर सकाळी 6 वाजून 31 मिनिटांपासून के 10 वाजून 31 मिनिटांपर्यंत आहे.
दुसरा मुहूर्त- दुपारी 11 वाजून 42 मिनिटांपासून ते 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे.
संध्याकाळचा मुहूर्त- संध्याकाळीही खरेदी करता येते. या दिवशी, संध्याकाळचा मुहूर्त 5 वाजून 38 मिनिटांपासून के 6 वाजून 04 मिनिटांपर्यंत असेल.
पूजेचा मुहूर्त
धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा संध्याकाळी केली जाते. 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजून 31 मिनिटं ते 8 वाजून 31 मिनिटं या वेळेत पूजा करता येईल. याचा अर्थ धनत्रयोदशीच्या पूजेसाठी तुम्हाला 1 तास 42 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल.
धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदानाचे महत्व
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे दान केले जाते. असेही मानले जाते की या दिवशी घरात दिवा लावल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते.
धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टींची करा खरेदी
1. तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी किंवा गणपतीची मूर्ती खरेदी करू शकता आणि दिवाळीच्या दिवशी तिची पूजा करू शकता.
2. या दिवशी सोनं, चांदी विकत घेणं शुभ मानलं जातं
3. तसेच तांबा, पितळ,चांदीची भांडी विकत घेणंही शुभ असतं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)