हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप खास मानला जातो. सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. १४ जानेवारीला संपूर्ण देशभरात मकरसंक्रांत सण साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीपासून शुभ कामांनाही सुरुवात होते. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी विसरता कामा नयेत. जर चुकून एखादी गोष्ट केली तर अश्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होईल, असे मानले जाते. याशिवाय जीवनात अडचणी वाढू शकतात.
वैदिक दिनदर्शिकेनुसार मंगळवार 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल, या दिवशी सूर्य देव सकाळी 9.03 वाजता धनु राशीतून बाहेर येऊन मकर राशीत प्रवेश करतील.
मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आंघोळ केल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नका. चुकूनही तुम्ही असे केल्यास सेवन केले अन्न अशुद्ध व विषारी बनते, असे मानले जाते.
मकर संक्रांतीच्या दिवशी नदीवर जाऊन स्नान करणे व दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु या दिवशी विसरूनही तेलाचे दान करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी तेलदान करणे अशुभ मानले जाते. असे केल्याने घरात आजार आणि नकारात्मकता येते, तसेच मकर संक्रांतीला पांढरा तांदूळ आणि चाकू, कात्री इत्यादी धारदार वस्तूंचे दान करणे टाळावे.
ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला एक पर्व म्हंटल आहे. त्यामुळे धार्मिक दृष्ट्या मकर संक्रांतीचे विशेष महत्व आहे. त्यामुळे या दिवशी मांसाहार खाऊ नये. तसेच मद्यपान करणे टाळावे. जर या दिवशी या गोष्टींचे पालन केले नाही तर तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येते आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
मकर संक्रांतीच्या दिवशी दारात येणाऱ्या कोणत्याही ब्राह्मण आणि गरजू व्यक्तीला रिकामे हात पाठवू नका काहींना काही दान करावे. याशिवाय कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका. तुम्ही जर या दिवशी या गोष्टी न केल्यास व्यक्ती पापाचा भागीदार बनू शकते, असे मानले जाते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)