मुंबई, आयुर्वेदात तुळशीची (Tulsi) वनस्पती खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. हिंदू धर्मात या वनस्पतीची देवता म्हणून पूजा केली जाते. घराच्या अंगणात तुळशीचे रोप असेल तर त्या घरात सुख-शांतीचे वातावरण राहते असे म्हणतात. या वनस्पतीचे औषधी गुणधर्म देखील खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळेच औषधी बनवताना त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हिंदूंच्या श्रद्धांबद्दल सांगायचे तर, तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी वास करते.
सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनात आनंद येतो आणि घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते. तथापि, तुळशीला रोज पाणी घालणे देखील अयोग्य मानले जाते. त्यासाठी दिवसही निश्चित करण्यात आले आहेत. याउलट जर तुम्ही रोज तुळशीला पाणी अर्पण करत असाल तर तुम्हालाही नुकसान होऊ शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी तुळशीच्या रोपामध्ये पाणी टाकू नये. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तुळमी माता रविवारी भगवान विष्णूचे निर्जला व्रत पाळते. अशा स्थितीत जल अर्पण केल्याने त्यांचा उपवास मोडू शकतो. यामुळेच या दिवशी तुळशीला पाणी घालणे टाळावे असे सांगितले जाते.
एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि माता तुळशीला अतिशय प्रिय आहे. देवूठाणी एकादशीचा दिवस तुळशीमातेसाठी अधिक खास मानला जातो कारण मान्यतेनुसार, या दिवशी तिचे लग्न झाले होते. अशा स्थितीत एकादशीला तुळशीच्या रोपामध्ये पाणी टाकू नये. या दिवशी तुळशीमातेचे व्रतही पाळले जाते. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत.
खूप प्रयत्न करुन देखील व्यवसायात किंवा नोकरीत मनाप्रमाणे यश मिळत नसेल तर आपल्याला गुरुवारी एक उपाय करायचा आहे. आपण हा उपाय गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवसाला करु शकता. या दिवशी आपल्याला श्याम तुळस अर्थात काळ्या तुळशीच्या जवळ असलेली गवत घेऊन पिवळ्या रंगाच्या कापड्यात बांधायची आहे आणि हे आपल्या तिजोरी, लॉकर, व्यवसायातील गल्ला किंवा किमती दागिने, वस्तू ठेवत असलेल्या जागेवर ठेवायची आहे. याने निश्चितच प्रगती होईल.
आपल्याला संतानकडून सुख मिळत नसेल किंवा आपल्या सांगण्यात नसेल तर रविवारीला तुळस तोडू नये म्हणून इतर दिवशी तुळशीचे तीन पाने तोडून संतानला खाऊ घालत्यास संतान आपल्या सांगण्यात राहील. तसेच तुळशी पूजन करताना आपल्या सवाष्ण दिसल्यास तिला लक्ष्मी स्वरुप मानून तुळशीचे वाहिलेले कुंकु लावावे आणि तेच कुंकु आपल्या संतानाला देखील लावावे. याने त्याची वागणूक चांगली होईल, वाईट संगत असल्यास दूर होईल.
आता महत्तवाची गोष्ट म्हणजे तुळशीचं झाडं पूर्व दिशेकडे असावं. असं करणं शक्य नसल्यास उपाय करण्याच्या दोन दिवसापूर्वीत तरी झाडाची दिश परिवर्तित करुन द्यावी.
तसेच ज्या कन्येचा विवाहाचा योग येत नसेल, तिने दक्षिण पूर्व दिशेत तुळशीचं झाडं ठेवून पूजन करावे. विवाहाचे योग जुळून येतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)