तुम्ही अनेकदा तुमच्या घरात किंवा बाल्कनीमध्ये कबुतरांचा वावर असल्याचं पाहिलं असेल. काही वेळेला तर हे कबुतरं तुमच्या घरात घरटं देखील तयार करतात. वारंवार हाकलून देखील हे कबुतरं तुमच्या घरातून जात नाहीत. त्यांनी जर तुमच्या घरात घरटं बनवलं असेल आणि पिल्लांना जन्म दिला असेल तर घरात प्रचंड घाण होते. कचरा होतो. ज्योतिष शास्त्रानुसार आणि वास्तू शास्त्रानुसार आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना आपल्याला कोणताना- कोणता संकेत देत असते. तुमच्या घरात कबुतरांचा वावर, कबुतरानं घरटं बनवलं या गोष्टी शुभ आहे की अशुभ याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
कबुतर हा सामान्यपणे एक चांगला आणि शांत पक्षी आहे. वास्तू शास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार जर कबुतरानं तुमच्या घरात घरटं बनवलं असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं.कारण कबुतराला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे.शास्त्रानुसार तुमच्या घरात जर कबुतरांचा सतत वावर असेल तर ते अत्यंत शुभ आहे. यामुळे तुमच्या घरात असलेली आर्थिक अडचण दूर होते. तुम्ही कर्जमुक्त होतात.तुम्हाला आयुष्यात कधीही पैशांची अडचण जाणवत नाही. त्यामुळे वास्तु शास्त्रानुसार तुमच्या घरात जर कबुतर येत असतील तर ते एक शुभ लक्षण आहे.
मात्र दुसरीकडे विज्ञानुसार कबुतराचा तुमच्या घरात असलेला वावर हा अनेक आजारांचे कारण ठरू शकतो. तुम्ही जर वारंवार कबुतरांच्या संपर्कात आला तर तुम्हाला अस्थमासारखे आजार होतात.तसेच इतर आजार होण्याची देखील शक्यता असते. कबुतरं जेव्हा तुमच्या घरात किंवा बाल्कनीमध्ये सकाळच्यावेळी येत असतील तर वास्त्रूशास्त्रानुसार ते एक चांगलं लक्षण आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)