Shree Ganesha | गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी ‘हे’ पाच उपाय करा, सर्व इच्छा होतील पूर्ण…

| Updated on: Mar 31, 2021 | 1:32 PM

हिंदू शास्त्रा बुधवारचा (Wednesday) दिवस हा भगवान गणेशाला (Lord Ganesha) समर्पित असतो. त्यामुळे बुधवारच्या दिवशी भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते.

Shree Ganesha | गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी हे पाच उपाय करा, सर्व इच्छा होतील पूर्ण...
ganesha
Follow us on

मुंबई : हिंदू शास्त्रा बुधवारचा (Wednesday) दिवस हा भगवान गणेशाला (Lord Ganesha) समर्पित असतो. त्यामुळे बुधवारच्या दिवशी भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते. या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांची संकटं दूर होतात आणि त्यांच्या आयुष्यात आनंद येतो. गणपती बाप्पा सर्व देवांमध्ये सर्वप्रथम पूजनीय आहेत. हेच कारण आहे की, कुठल्याही पूजेपूर्वी गणेशाची पूजा केली जाते. गणेशाची पूजा केल्याने बिघडलेली कामंही बनतात (Do These 5 Upay To Make Lord Ganesha Happy).

भगवान श्रीगणेशाच्या पूजेत हे उपाय करा –

गणेशाला दुर्वा समर्पित करा –

गणपती बाप्पाला दुर्वा अति प्रिय आहे. बुधवारच्या दिवशी श्रीगणेशाची पूजा करताना त्यांना दुर्वा नक्की समर्पिच करा. असं केल्याने भगवान गणेशाचा आशीर्वाद भक्तांना मिळतो.

भगवान गणेशाला मोदकाचं नैवैद्य दाखवा

मोदक भगवान गणेशाला अति प्रिय आहे. त्यामुळे बुधवारच्या दिवशी श्रीगणेशाला मोदकांचं नैवैद्य नक्की दाखवा.

लाल फूल समर्पित करा –

भगवान गणेशाला लाल फूल समर्पित करावं. जर लाल फूल समर्पित करणे शक्य नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही फूल चढवू शकता. फक्त या गोष्टीची काळजी घ्या की भगवान गणेशाच्या पूजेत तुळशीच्या वापर केला जाऊ नये.

गणपतीला प्रिय आहे लाल सिंदूर –

गणपती बाप्पाला लाल सिंदूर अत्यंत प्रिय आहे. भगवान गणेशाचा पाण्याने अभिषेक केल्यानंतर त्यांना लाल सिंदूर समर्पित करा. त्यानंतर स्वत:च्या कपाळालाही लाल सिंदूरने टिळा करा. हे तुम्ही दररोजही करु शकता. भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल (Do These 5 Upay To Make Lord Ganesha Happy).

शमीच्या पानांने गणेशजी होतात प्रसन्न

शास्त्रांनुसार शमी हा एकमात्रा अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केल्याने श्रीगणेश आणि शनी देव दोघेही प्रसन्न होतात. अशी मान्यता आहे की भगवान श्रीरामानेही रावणावर विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती. शमी हे गणेशाला अत्यंत प्रिय आहे. शमीची काही पानं नियमितपणे गणेशाला समर्पित करा. असं केल्याने घरात सुख-समृद्धी वाढते, अशी मान्यता आहे.

Do These 5 Upay To Make Lord Ganesha Happy

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 | भालचंद्र संकष्टी चतुर्थी कधी?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 | भालचंद्र संकष्टी चतुर्थी आज, जाणून घ्या काय करावे आणि काय करु नये…