प्रभू श्रीराम आणि माता सीतेचा विवाह मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमी या तिथीला झाला होता, म्हणून शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला विवाह पंचमी असेही म्हणतात. हा सण दरवर्षी मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी साजरा केला जातो. तर आपल्या हिंदू समाजात काही लोकांची अशी विचार धारणा आहे कि विवाह पंचमीला लग्न केल्याने पती-पत्नीचे वैवाहिक जीवन संघर्षमय राहते, त्यामुळे या दिवशी आई-वडील आपल्या मुलांची लग्न करत नाहीत. तर काही लोक असेही मानतात की प्रत्येक लोकांचे स्वतःचे कर्म आणि नशीब असते, त्यानुसार इतरांचे वैवाहिक जीवन सुखी चालते, अशा परिस्थितीत विवाह पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांचे लग्न करण्यास काहीच हरकत नसते. याचबरोबर विवाहपंचमीच्या दिवशी असे काही काम अवश्य करावे, जेणेकरून तुमच्या पुण्यकर्मात वाढ होऊ शकेल. चला, जाणून घ्या विवाह पंचमीला कोणते काम करावे.
विवाह पंचमीला गरीब मुलीचे कन्यादान करा
विवाह पंचमीला गरीब मुलीचं कन्यादान जरूर करा, ज्यांना आई-वडील नाहीत अश्या मुलींचे लग्नाच्यादिवशी कन्यादान केल्यास पुण्य मिळते. तसेच शास्त्रात कन्यादान हे सर्वात मोठे दान मानले गेले आहे, म्हणून गरीब आणि गरजू मुलीचे कन्यादान केल्याने तुमचे पुण्यकर्म वाढते.
विवाह पंचमीला दान अवश्य करा
विवाह पंचमीच्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार ज्या गोष्टीचे दान करता येईल ते करावे. कोणत्याही संस्थेत, गरजू व्यक्तीकडे, मंदिरात जाऊन तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दानधर्मात अन्नदान, जलदान, वस्त्रदान किंवा काहीही एखाद्याच्या गरजेनुसार दान करू शकता.
विवाह पंचमीला गरिबांसाठी भंडारा ठेवा
एखाद्या भुकेल्या व उपाशी असलेल्या गरीब माणसाचे पोट भरणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. तुम्ही जर मंदिराबाहेर किंवा संस्थनामध्ये जाऊन भुकेल्या व्यक्तींना जेवण दिल्याने माणसांचे पोट भरते व त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. त्याचबरोबर तुम्ही पशु-पक्ष्यांसाठी अन्नधान्याची व्यवस्था करणेही महत्वाच आहे.
विवाह पंचमीला राम-सीतेच्या नावाने वृक्षारोपण करा
झाडे आणि वनस्पती हा निसर्गाचा च एक भाग आहे, त्यामुळे विवाहपंचमीच्या दिवशी तुम्ही जर वृक्षारोपण केल्याने निसर्गमाता प्रसन्न होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी वनस्पती लावू शकता. निसर्गाला वनस्पती अर्पण केल्याने पुण्यकर्मात वाढ होते. तसेच प्रभू श्रीराम आणि माता सीतेची कृपा तुमच्यावर कायम राहते.
विवाह पंचमीला भजन, पूजा आणि गंगा स्नान करा
विवाहपंचमीचा दिवशी तुम्ही भजन-कीर्तन, पूजा आणि गंगास्नान करणे चांगले मानले जाते. त्यामुळे विवाहपंचमीला प्रभू श्रीराम आणि माता सीतेची पूजा करावी आणि भजन-कीर्तन करावे. तसेच विवाहपंचमीला गंगेचे स्नान करणे देखील खूप महत्वाचे आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांना राम आणि लक्ष्मी यांचे रूप मानले जाते, म्हणून विवाह पंचमीला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही पूजा करावी.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)