मुंबई : अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही लग्नाला उशीर होतो किंवा मनाप्रमाणे जीवनसाथी मिळत नाही, हे सर्व कुंडलीत असलेल्या ग्रहांच्या (Planets )स्थितीमुळे होते. ज्योतिष शास्त्रानुसार या समस्या दूर करण्यासाठी महाशिवरात्रीचा (Mahashivratri) दिवस खूप शुभ मानला जातो . या दिवशी महादेव (Mahadev) आणि माता पार्वतीचा विवाह झाल्याचे मानले जाते . महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण भक्तीभावाने उपवास आणि पूजा केल्यास आणि काही उपाय केल्यास सर्व समस्या दूर होतात. याशिवाय वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीही हा दिवस अतिशय शुभ मानला जातो . जर तुमच्या आयुष्यातही अशा समस्या असतील तर येथे जाणून घ्या असे काही उपाय जे तुमच्या या समस्या दूर करण्यात प्रभावी ठरतील.
वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी
वारंवार प्रयत्न करूनही लग्न जमत नसेल किंवा या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिरात 5 नारळ वाहावेत. प्रथम शिवलिंगाचा जलाभिषेक करा आणि त्यानंतर शिवाला चंदन, फुले, बेलची पाने, फळे, धतुरा इत्यादी अर्पण करा. यानंतर ‘ओम श्री वर प्रदाय श्री नमः’ या मंत्राचा जप करा. तुम्ही एक ते किमान 5 जपमाळ जप करू शकता. त्यानंतर ते नारळ शिवाला अर्पण करावे.
इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी
जर तुमच्या इच्छित जीवनसाथीचा शोध पूर्ण होत नसेल तर शिवमंदिरात जाऊन प्रथम गंगाजलाने रुद्राक्ष स्वच्छ करा. यानंतर हातात घेऊन ‘ओम गौरी शंकर नमः’ या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.
वैवाहिक जीवनात समस्या असल्यास
तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील, पतीसोबत भांडण होत असतील तर गौरीशंकरचे दोन रुद्राक्ष धारण करा. महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांना गंगेच्या पाण्याने स्वच्छ करा आणि महादेवाच्या ‘ओम गौरी शंकर नमः’ या मंत्राचा जप करत राहा. यानंतर शिवलिंगाला स्पर्श केल्यानंतर ते लाल धाग्यात घालून ते स्वतः परिधान करा आणि तुमच्या जोडीदारालाही घाला. काही वेळातच तुमचे वैवाहिक जीवन सुखकर होऊ लागेल.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
Chanakya Niti : सावधान! , आयुष्यात या 5 गोष्टी झाल्यास देवी लक्ष्मी रागवलीच म्हणून समजा
28 February 2022 Panchang : 28 फेब्रुवारी 2022, सोमवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ