मुंबई : शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित असते. या दिवशी पूजा अर्चना करुन शनिदेव प्रसन्न होतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिना (Vaishakh Month) सुरु झाला आहे. हा महिना पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. या महिन्यात पूजा-अर्चना केल्याने तुम्हाला भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्माजी यांच्याकडून विशेष फळाची प्राप्ती होते (Do These Upay During Vaishakh Month To Make Shanidev Happy).
अशा परिस्थितीत वैशाख महिन्याच्या पहिल्या शनिवारी नियमितपणे उपाय केल्यास शनिदेवाची साडेसाती, महादशा आणि शनिचा प्रकोप टाळता येऊ शकते. त्या उपायांबद्दल जाणून घ्या.
वैशाख महिन्यात एखाद्याची तहान भागवल्याने सर्व तीर्थक्षेत्रांचं पुण्य प्राप्त होते. प्राणी-पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा. याशिवाय रस्त्याने जाणाऱ्यांना पाणी देण्याची व्यवस्था करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर हनुमानाची पूजा करावी. पूजेमध्ये सिंदूर, काळ्या तीळाचं तेल इत्यादींचा उपयोग केला जातो. याशिवाय, या दिवशी सुंदरकांड आणि हनुमान चालीसाचे पठण करणे खूप शुभ मानले जाते.
ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी कुशच्या आसनावर बसून शनिदेवाची पूजा करावी. यानंतर, रुद्राक्षाच्या जपमाळेसह शनि मंत्राचा जप केल्यास शुभ परिणाम प्राप्त होतात.
शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. या दिवशी दीप प्रज्वलित केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. तसेच, कुंडलीतील शनिच्या साडेसातीचा आणि महादशेचा प्रभाव कमी होतो. या दिवशी काळ्या छत्रीचं दान करावं. तसेच यादिवशी काळ्या गाईला तूपाची चपाती खायला द्या.
या दिवशी शनिदेवाला काळा हरभरा आणि काळ्या तिळीचं नैवेद्य दाखवावं, असे केल्याने सर्व त्रास दूर होतात. शनिदेवाचे अशुभ दृष्टीपासून वाचण्यासाठी भाविक विविध उपाययोजना करतात. हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायाचा देव म्हटले जाते. असे मानले जाते की शनिदेव एखाद्याला त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात. जर शनिदेव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न असेल तर ते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
Shanidev | शनिदेवाला तेल का अर्पण करतात? जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा…https://t.co/7usKGMbu8J#ShaniDev
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 16, 2021
Do These Upay During Vaishakh Month To Make Shanidev Happy
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Shanidev | ‘या’ लोकांवर शनिदेव राहतात प्रसन्न, पूर्ण होतात सर्व मनोकामना…
घरात शनिदेवाची मूर्ती ठेवणे वर्जित का? जाणून घ्या यामागील कारण…
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दानधर्म करा, साडेसातीची पीडा निवारण्याचे ज्योतिषशास्त्रात उपाय काय?