सुकलेल्या तुळशीच्या मुळाशी टाका ही एक वस्तू; तुळस हिरवीगार होऊन डोलू लागेल!

| Updated on: Jun 17, 2022 | 6:54 PM

आपल्यापैकी अनेक जणांच्या घरांमध्ये त्यापेक्षा सगळ्यांच्याच घरांमध्ये तुळशीचे रोप ( green basil)असते. पण कधी कधी काही कारणास्तव हे तुळशीचे रोप वाढते म्हणजेच सुकून मरून जाते आणि आपण या रोपाला मेले आहे म्हणून फेकून देतो पण आज आपण जाणून घेणार आहोत हेच मेलेले किंवा वाळलेले रोग आपण फक्त सात दिवसांमध्ये परत जिवंत करू शकतो. ते परत […]

सुकलेल्या तुळशीच्या मुळाशी टाका ही एक वस्तू; तुळस हिरवीगार होऊन डोलू लागेल!
Follow us on

आपल्यापैकी अनेक जणांच्या घरांमध्ये त्यापेक्षा सगळ्यांच्याच घरांमध्ये तुळशीचे रोप ( green basil)असते. पण कधी कधी काही कारणास्तव हे तुळशीचे रोप वाढते म्हणजेच सुकून मरून जाते आणि आपण या रोपाला मेले आहे म्हणून फेकून देतो पण आज आपण जाणून घेणार आहोत हेच मेलेले किंवा वाळलेले रोग आपण फक्त सात दिवसांमध्ये परत जिवंत करू शकतो. ते परत हिरवेगार करू शकतो.चला तर मग जाणून घेऊया यासाठी आपल्याला कोण कोणते उपाय (remedy) करायचे आहेत, जेणेकरून ते झाड परत एकदा पूर्वीसारखे हिरवेगार दिसायला लागेल. आता हे तुळशीचे रोप पूर्णपणे मेले आहे का? किंवा पूर्णपणे वाढले आहे का हे तपासून घेण्यासाठी आपल्याला त्या रोपाच्या खोडावर नखाने थोडेस खरचटून पाहायचे आहे. हे केल्यानंतर जर वरची साल निघून आतमध्ये थोडेसे हिरवे दिसत असेल तर ते झाड परत जिवंत होऊ शकते म्हणजेच ते पूर्वीसारखे हिरवेगार होऊ शकते, हे आपल्याला समजून घ्यायचे आहे.

आता त्यानंतर आपल्याल या तुळशीच्या रोपाच्या वरील सर्व सुकलेल्या फांद्या तोडून घ्यायच्या आहेत आणि तुळशीचे रोप ज्या कुंडीमध्ये लावलेले आहे.या कुंडी मधील गळून पडलेली पाने किंवा वरील ज्या काही गोष्टी असतील त्या काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण या तुळशीच्या रोपावर ती करणाऱ्या प्रक्रिया करायला आपल्याला सोपे जाईल. सोबतच आपल्याला या कुंडी मधील माती कशाचाही सहाय्याने थोडी वर वर खोदून घ्यायची आहे.

आता या मातीवर आपल्याला थोडीशी हळद टाकून द्यायची आहे आपण येथे हळदीचा वापर यासाठी करत आहोत.कारण हळद अँटीबायोटिक असते आणि कीटकनाशकांना मारण्यासाठी देखील मदत करते त्यामुळे हळदीचा वापर केल्यास त्या मातीमध्ये असणारे कीटक मरून जातील आणि ती माती परत एकदा आपल्या रोपासाठी गुणकारी बनेल. हे करून झाल्यावर एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचे आहे त्यानंतर मोहरीची पेंढ यामध्ये टाकायचे  आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे हळद देखील टाकायचे आहे.आता या मिश्रणाला आपल्याला कमीत कमीत 12 तास तसेच झाकून ठेवायचे आहे. बारा तासानंतर हे मिश्रण आपल्याला रोप लावलेल्या कुंडी मध्ये रोपाच्या मुळाशी टाकायचे आहे. आपण बाकी कोणत्याही गोष्टी फर्टीलायझर म्हणून वापरायचा नाही आहे. या उपायाने तुमची सुकलेली तुळस पुन्हा हिरवीगार होऊन डोलू लागेल.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)