नवं वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, येणारं वर्ष हे आपल्याला सुखाचं, आनंदाचं, समाधानाचं जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण नव वर्षाच्या सुरुवातीला एखाद्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात, देवाचं दर्शन घेतात, देवाकडे प्रार्थना करतात.आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला येणारं नवीन वर्ष हे आनंदाचं सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जाण्यास मदत होईल. माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या राशीनुसार 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पूजा करावी लागेल.
महालक्ष्मीची पूजा करा
ज्यांची रास मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ किंवा मीन आहे अशा लोकांनी 31 डिसेंबरच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करावी, मात्र तुम्हाला महालक्ष्मी मातेच्या पुजेचं फळ मिळावं यासाठी भगवान विष्णूची पूजा देखील करावी. शास्त्रानुसार तुम्ही जर महालक्ष्मीच्या पुजेसोबत भगवान विष्णूची पूजा केली तर तुम्हाला पुजेचं फळ लवकर मिळतं. महालक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहाते घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
ही चूक टाळा
ज्योतिष शास्त्रानुसार अनेक लोक ही चूक करतात, ते महालक्ष्मीची पूजा तर करतात, मात्र भगवान विष्णूची पूज करत नाहीत. या चुकीमुळे तुम्हाला पुजेचं पूर्ण फळ मिळत नाही. मात्र तुम्ही जर माता महालक्ष्मीच्या पुजेसोबत भगवान विष्णूची पूजा केली तर तुम्हाला त्या पुजेचं फळ लवकर मिळतं. नव्या वर्षात वर्षभरत तुमच्या घरात सुख, समुद्धी आणि आनंद राहातो.
पूजा कधी करावी?
ज्योतिष शास्त्रात सांगितल्यानुसार नव वर्ष सुरू झाल्यानंतर म्हणजेच 31 डिसेंबरच्या मध्यरात्री म्हणजे बारानंतर ते एक जानेवारीच्या पाहाटे चारपर्यंत तुम्ही मता महालक्ष्मीची पूजा करू शकता. यामुळे तुम्हाला पैशांची कधीही कमतरता भासणार नाही.
डिस्क्लेमर : (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)