आपल्याला घरी गेल्यावर मानसिक शांती मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. घरात स्वच्छता ठेवण्यापासून रंगसंगतीची काळजी घेतली जाते. पण वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत तर बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं. अनेकदा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे वास्तुशास्त्राचे काही नियम आवर्जून पाळणं गरजेचं आहे. खासकरून अटॅच बाथरूमबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. कारण घरात अटॅच बाथरूम असेल आणि नियम पाळले गेले नाहीत, अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वास्तुशास्त्रात अटॅच बाथरूमबाबत काही नियम सांगितले गेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार, खोलीत अटॅच बाथरूम असेल तर ते स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. तसेच वेळोवेळी त्याची स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे. जर हे नियम पाळले नाहीत तर घरात नकारात्मक उर्जेचा वास होतो. कुटुंबातील लोकांना निद्रानाशेच्या समस्येला सामोरं जावं लागतं. इतकंच काय तर पती पत्नीच्या नात्यात दूरावा निर्माण होऊ शकतो.
घरातील अटॅच बाथरूममध्ये टॉयलेट सीट व्यवस्थित आहे का नाही ते तपासून घ्या. तुटलेलं असेल तर तात्काळ बदलून घ्या. बाथरूमचा दरवाजाही व्यवस्थित असणं आवश्यक आहे. नाहीत वास्तुदोष लागतो. दरम्यान, वास्तुशास्त्रानुसार, बाथरूम दक्षिण किंवा ईशान्य दिशेला नसावं. जर असेल आणि बदलणं शक्य असेल तर तात्काळ बदला. अन्यथा वास्तुदोषाला सामोरं जावं लागतं. घराच्या पूर्व दिसेला स्नानघर असणं शुभ मानलं गेलं आहे.
दुसरीकडे, बेडरूममध्ये अटॅच बाथरूम असेल तर त्याकडे पाय करून झोपू नये. असं केल्यास वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. झोपण्यासाठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय असं वास्तुशास्त्र सांगतं. घरात अटॅच बाथरूम असेल तर वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)