रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांतील व्यक्तिरेखा कोणत्या, जाणून घ्या…

| Updated on: May 24, 2021 | 10:48 AM

रामायण आणि महाभारत या दोन्ही वेगवेगळ्या कालखंडातील कथा आहेत, हे सर्वश्रुत आहे. युग पूर्ण होण्यासाठी कित्येक हजार वर्षे लागतात. यामध्ये रामायणची कथा म्हणजे त्रेतायुगाची कथा आहे, तर महाभारत द्वापर युगात घडले आहे.

रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांतील व्यक्तिरेखा कोणत्या, जाणून घ्या...
Parshuram-Hanuman
Follow us on

मुंबई : रामायण आणि महाभारत या दोन्ही वेगवेगळ्या कालखंडातील कथा आहेत, हे सर्वश्रुत आहे. युग पूर्ण होण्यासाठी कित्येक हजार वर्षे लागतात. यामध्ये रामायणची कथा म्हणजे त्रेतायुगाची कथा आहे, तर महाभारत द्वापर युगात घडले आहे. म्हणजेच रामायण ही आधीची कथा आहे आणि त्या नंतरची महाभारत ही कथा आहे. तुम्ही टीव्हीवर रामायण आणि महाभारत दोन्ही पाहिले असतील, ज्यात अनेक प्रकारची पात्रं आहेत (Do You Know About Those Persons Who Appeared In Ramayana As Well As Mahabharata).

परंतु, रामायण आणि महाभारत या दोन्ही कथांमध्ये उल्लेख केलेले बरेच पात्र आहेत, हे आपल्या कधी लक्षातही आले नसेल? म्हणजेच, त्या लोकांची केवळ रामायणातच नव्हे, तर महाभारतातही महत्त्वपूर्ण भूमिका होती. असे म्हणतात की, त्यांचे आयुष्य खूप मोठं होतं आणि एक अवतार असल्याने यांची उपस्थिती दोन्ही युगात त्यांचे अस्तित्व आहे. कोण आहेत हे लोक जाणून घेऊ –

? परशुराम

तुम्ही रामायण पाहिले असेलच, तेव्हा सीता स्वयंवरावेळी जेव्हा भगवान रामाने धनुष्य मोडला तेव्हा परशुराम तिथे येतात. यानंतर त्यांना भगवान राम यांना आपले सुदर्शन दिले. यानंतर महाभारतातही परशुरामांचा उल्लेख बर्‍याच ठिकाणी आढळतो. महाभारतात परशुराम यांनी कर्णलाही प्रशिक्षित केले होते. अशा परिस्थितीत असे म्हणता येईल की परशुराम हे रामायण आणि महाभारत या दोन्ही ठिकाणी होते.

? हनुमान

रामायणात हनुमानजींची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. राम आणि रावण यांच्या युद्धात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि ते सर्वात मोठे रामभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर हनुमान जींचा उल्लेख महाभारतातही आहे. महाभारतात पांडव पुत्र भीमा आणि हनुमान यांच्यातील संभाषणंही दर्शविण्यात आले आहे.

? महर्षी दुर्वासा

दुर्वासा ऋषी हे देखील रामायण आणि महाभारत दरम्यान दिसलेल्यांपैकी एक आहेत. दुर्वासा ऋषी आणि दशरथ यांच्यातील संभाषण रामायणात बर्‍याचवेळा दर्शवण्यात आले आहेत. त्याशिवाय, महाभारतात ऋषी दुर्वासा पांडवांच्या वनवासावेळी द्रौपदीची परीक्षा घेण्यासाठी तिच्या झोपडीत पोहोचले होते.

? जाम्वंत

रामायणातील जाम्वंतची भूमिका पाहिली असेल. सीताजींचा शोध घेण्यासाठी आणि रावणाबरोबरच्या युद्धात त्यांनी भगवान श्रीरामांना कशी मदत केली, हे तुम्ही पाहिलेच असेल. परंतु, असे म्हटले जाते की जाम्वंत महाभारताच्या काळातही होते आणि त्यांनी श्रीकृष्णाबरोबर युद्धही केले होते.

Do You Know About Those Persons Who Appeared In Ramayana As Well As Mahabharata

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Sita Navami 2021 | सीता नवमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचं महत्त्व

Mohini Ekadashi 2021 : सुख-समृद्धी, आनंद हवाय? मोहिनी एकादशीला हे उपाय करा…