सूर्यास्तानंतर पूजा करणाऱ्यांनी ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या सकळ आणि संध्याकाळच्या पुजेमधला फरक
हिंदू धर्मात (Hindu religion) पूजापाठ (ritual) करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे घरातील वातावरणही प्रसन्न राहते. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सहसा अनेक जण सकाळी पूजा करणे पसंत करतात, मात्र काही कारणाने सकाळी पूजा करणे शक्य न झाल्यास अनेक जण संध्याकाळी पूजा करतात. शास्त्रात सकाळी आणि संध्याकाळी केली जाणारी पूजा आणि त्याचे नियम वेगवेगळे आहेत(does and don’t). […]
हिंदू धर्मात (Hindu religion) पूजापाठ (ritual) करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे घरातील वातावरणही प्रसन्न राहते. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सहसा अनेक जण सकाळी पूजा करणे पसंत करतात, मात्र काही कारणाने सकाळी पूजा करणे शक्य न झाल्यास अनेक जण संध्याकाळी पूजा करतात. शास्त्रात सकाळी आणि संध्याकाळी केली जाणारी पूजा आणि त्याचे नियम वेगवेगळे आहेत(does and don’t). जर तुम्ही सूर्यास्तानंतर पूजा करीत असाल तर हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. पूजा करताना तुम्ही या गोष्टी कधीच विसरू नका. शास्त्रात याचे काही दुष्परिणामही सांगण्यात आले आहे.
- रात्र होण्याआधी संघ्याकाळची पूजा करायला हवी. रात्री पूजा करू नये असे शास्त्र सांगते, म्हणून तर तिन्ही सांजेला घरोघरी दिवे लावले जातात. आजही अनेक घरांसमोर तिन्ही सांजेला दिवे लावण्याची परंपरा कायम आहे.
- गायत्री मंत्र सूर्यास्तानंतर ऐकू नये. सकाळी गायत्री मंत्र म्हटल्याने त्याचा फायदा चांगला होतो. संध्याकाळी आरती करताना घंटा वाजवून करावी. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- पूजा आणि दिवा शांत झाल्यानंतर रात्री देवाऱ्यातील फूल काढून बाजूला ठेवावीत आणि देवाऱ्याला पडदा लावावा. हा पडदा सकाळी उघडावा. एकदा पडदा लावला की तो मध्ये उघडू नये.संध्याकाळी पूजा करताना तुम्ही देवाला फूल अर्पण करू शकता. मात्र ती फूल संध्याकाळी तोडून आणलेली नसावीत. ती फुलं सकाळी तोडून आणलेली हवीत.
- नारायणाच्या पूजेत तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुम्ही तुळस अर्पण करणार असाल तर त्या तुळशी सकाळी तोडून ठेवायला हव्यात. संध्याकाळी तुळशीची पान तोडून ती देवाला अर्पण करू नयेत.
- तुम्ही जर सूर्यदेवाची पूजा करत असाल तर तो दिवसाच करावा. सूर्यास्तानंतर करू नये. सूर्याची सकाळी लवकर पूजा करणं केव्हाही चांगलं आणि लाभदायी मानलं जातं.
- पूजेच्या दोन्ही वेळी दिवा लावायला हवा. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. तुळशीसमोर दिवा लावावा. त्यामुळे घरातील समस्या दूर होतात. सुख-समृद्धी घरात नांदते.