मासिक दुर्गा अष्टमीला करा या वस्तूंचे दान, सर्व समस्यांपासून मिळेल मुक्ती

| Updated on: Jan 08, 2025 | 12:20 PM

दुर्गाष्टमीच्या दिवशी जर तुम्ही देवी दुर्गेची पूजा करणार असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण पूजेमध्ये एखादी चूक झाल्यास तुम्हाला त्या पूजेचे फळ मिळणार नाही.

मासिक दुर्गा अष्टमीला करा या वस्तूंचे दान, सर्व समस्यांपासून मिळेल मुक्ती
Follow us on

दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गा देवीची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी दुर्गा आपल्या भक्तांवर प्रसन्न असते. दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवी जी शक्तीची देवी आहे तिची पूजा केली जाते. दुर्गा देवी वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी तिची पूजा करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. या दिवशी दुर्गादेवीची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. दुर्गादेवी आपल्याला आत्मविश्वास आणि धैर्य प्रदान करते.

पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी ही 6 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 6:23 मिनिटांनी सुरू होईल आणि 7 जानेवारीला संध्याकाळी 4: 26 मिनिटांनी समाप्त होईल. दर महिन्याला येणाऱ्या दुर्गाष्टमी ची पूजा ही मध्यरात्री केली जाते. यानुसार मंगळवारी 7 जानेवारी रोजी दुर्गाष्टमी असणार आहे.

दुर्गाष्टमी पूजा विधि
1. दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
2. पूजेचे ठिकाण स्वच्छ करून फुलांनी आणि दिव्यांनी सजवा.
3. दुर्गादेवीचा फोटो किंवा मूर्ती लाल कपड्याने झाकून ठेवा.
4. दुर्गादेवीला गंगाजलने अभिषेक करा आणि तिला फुले, चंदन, कुंकू इत्यादी अर्पण करा.
5. या दिवशी दुर्गादेवीच्या विविध मंत्रांचा जप करा.
6. या दिवशी देवीला नैवेद्य दाखवा. नैवेद्यामध्ये तुम्ही फळे, मिठाई किंवा इतर पदार्थ देखील ठेवू शकता.
7. दुर्गादेवीची आरती करून आशीर्वाद घ्या आणि शक्य असल्यास अन्नदान करा.

दुर्गाष्टमीच्या दिवशी करा या गोष्टींचे दान

तूप
ज्योतिष शास्त्रानुसार तुपाचे दान केल्याने समृद्धी मिळते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य, चंद्र, मंगळ आणि गुरूचा अशुभ प्रभाव असेल तर त्यांनी तुपाचे दान करावे.

जव
जव हे सृष्टीचे प्रतीक मानले जाते. देवी देवतांना जव अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. दुर्गा देवीला जव अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते.

कपडे
दुर्गाष्टमीच्या दिवशी कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

कुमारिकांना खीर आणि शिरा द्या
दुर्गा मातेला खीर आणि शिरा हे मुख्य प्रसाद असतात. असे मानले जाते की हे पदार्थ कुमारिकांना दिल्यास देवी प्रसन्न होते आणि सुख शांती मिळते.

फळे दान करा
जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला फळ दान करा. असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)