हिंदू धर्मात गुरुवार भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तसचे गुरु ब्रहस्पती यांचा दिवस आहे. या दिवशी भगवानाचा कृपा झाल्यास जीवन सार्थक होते. भगवान विष्णू सृष्टीचे पालनहार समजले जातात. प्रत्येक व्यक्तीला वाटते की, त्यांनी कृपा आपल्यावर राहावी. जीवनात सुख-समृद्धी राहावी. परंतु, प्रयत्न करूनही कधी-कधी व्यक्ती परेशान राहतो. अशा लोकांनी गुरुवारी भगवान श्रीहरीची पूजा केली पाहिजे. ते प्रसन्न राहून सर्व कार्य पूर्ण करतात. लग्नापासून व्यवसायापर्यंत येणाऱ्या समस्या सोडवतात. गुरुवारी या वस्तू दान केल्याने ही सर्व काम होतात.
गुरुवारी भगवान श्रीहरी यांना आठवून काही उपाय केल्यास बाधा दूर होतात. सुख-समृद्धी येते. भविष्याचे बंद रस्ते सुरू करण्यासाठी या वस्तूंचे दान अवश्य करा. गुरुवारी गायीला कणक भिजवून चारावी. त्यात गूड, चन्याची दाळ आणि हळदी लावावी. तसेच कोण्या गरिबाला केळ, दाळ आणि पिवळे कपडे दान करावेत.
गुरुवारी ब्राम्हणाला पिवळे कपडे दान केले पाहिजे. यामुळे न होणारी कामसुद्धा होतात. लग्नात अडचण येत असेल, तर हळदीचे दान लाभदायक मानले जाते. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान चांगले समजले जाते. व्यापार चांगला चालत नसेल तर गुरुवारी एका पानाच्या पत्त्यात दोन हळदीच्या गाठी ठेवून भगवान विष्णूला चढवल्या जातात. यामुळे परेशानी दूर होते.
गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात केवडा आणि केसरचे दान करावे. असा उपाय केल्याने माँ लक्ष्मी प्रसन्न होऊन सुख-समृद्धी देते. गुरुवारी गुरू बृहस्पतीची पूजा करून त्यांना पिवळे फळ अर्पित करावे. असं केल्याने नोकरीत येणारी समस्या दूर होते.
भगवान श्रीहरी आणि माँ लक्ष्मीच्या मंदिरात आंबे चढवल्याने परेशानी दूर होते. घरात सुख-समृद्धी नांदते. गुरुवारी साखर आणि दूधाचे दान चांगले समजले जाते. दैनंदिन समस्या यामुळे दूर होतात.
(टीप – ही माहिती धार्मिक आस्था आणि लोकमान्यतेवर आधारित आहे. याला वैज्ञानिक आधार नाही. सामान्यांची आवड असल्याने ही माहिती दिली आहे.)