Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला या चुका करणं टाळा, नाही तर पश्चाताप करण्याची येईल वेळ
मुंबई – चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमंताची जन्मतिथी..या दिवशी मोठ्या उत्साहाने हनुमान जयंती साजरी केली जाते. यंदा 6 एप्रिल 2023 रोजी हनुमान जयंती आहे. हनुमान भक्त मोठ्या श्रद्धेने या दिवशी मारुतीरायाची पूजाविधी करतात. त्रेतायुगात हनुमान यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला मंगळवारी झाला होता. यामुळे मंगळवार बजरंगबलींना समर्पित आहे. या दिवशी सुंदरकांड, हनुमान चालीसा, मारुती स्त्रोताचं पठण केल्यास चांगलं फळ मिळतं.
हनुमान जयंती तिथी
चैत्र पौर्णिमा तिथी 5 एप्रिल 2023, सकाळी 9 वाजून 19 मिनिटांनी सुरु झाली आहे. चैत्र पौर्णिमा तिथी समाप्ती 6 एप्रिल 2023, सकाळी 10 वाजून 4 मिनिटं असेल. उदयतिथीनुसार हनुमान जयंती 6 एप्रिल 2023 रोजी साजरी केली जाईल.
हनुमान जयंतीला या गोष्टी चुकूनही करु नका
- सुतक कालावधी – हनुमंताची पूजा कधीही सुतक काळात करू नये. म्हणजेच घरात किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास सुतक लागतं. सुतक काळ 13 दिवसांसाठी पाळला जातो. या काळात पूजा विधी केली जात नाही.
- स्त्रियांचा स्पर्श – चिरंजीवी बजरंगबली हे ब्रह्मचर्य आहेत. त्यामुळे हनुमान जयंतीला स्त्रियांनी त्यांना स्पर्श करू नये. या दिवशी ब्रह्मचर्याचं मोठ्या सक्तीनं पालन केलं जातं.
- चरणामृत स्नान – हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या चरणामृताचं स्नान करू नये. त्यांच्या पुजेत चरणामृत करण्याची पद्धत नाही.
- काळे पांढरे वस्त्र घालू नका – बजरंगबलीच्या पूजेत चुकूनही काळे किंवा पांढरे वस्त्र घालू नये. यामुळे अशुभ परिणाम भोगावे लागतात.
- खंडीत प्रतिमा किंवा मूर्ती – हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या तुटक्याफुटक्या मूर्ती किंवा छबीचा वापर करू नये. कारण खंडित मूर्तीमुळे अशुभ फळं मिळतात.
- मीठ – हनुमान जयंतीला मिठाचं सेवन करू नये. तसेच ज्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत त्यातही मिठ नसेल याची काळजी घ्यावी.
- मास आणि मद्य – हनुमान जयंतीला मास आणि मद्याचं सेवन करू नये. तसेच शारीरिक संबंध ठेवू नये. तसेच रागाच्या भरात कोणताही अपशब्द वापरू नये.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)