मुंबई : हिंदू धर्मात दुर्गाष्टमी (Durgashtami) व्रताला विशेष महत्त्व आहे. मासिक दुर्गाष्टमी व्रताला देवीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी पौराणिक मान्यता आहे. 26 जुलैला म्हणजेच उद्या अधिक मासमध्ये दुर्गा अष्टमी व्रत पाळण्यात येईल. हिंदू कॅलेंडरनुसार, दुर्गाष्टमीचा उपवास प्रत्येक महिन्याच्या आठव्या दिवशी केला जातो. दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा केल्याने जीवनात शक्ती आणि यश मिळते. यासोबतच मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी व्रत केल्यास साधकाला पुण्य लाभते आणि कुटुंबात सुख-शांती नांदते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण अधिक मासमधील अष्टमी तिथी 25 जुलै 2023 रोजी दुपारी 15.09 पासून सुरू होईल, जी 26 जुलै रोजी दुपारी 3.53 पर्यंत चालेल. उदय तिथीनुसार 26 जुलैलाही दुर्गा देवीची पूजा करता येते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)