Dussehra 2022: भारतातल्या या ठिकाणी आहे रावणाचे मंदिर, फक्त दसऱ्याच्याच दिवशी असते लोकांसाठी खुले

| Updated on: Oct 05, 2022 | 11:00 AM

दसऱ्याच्या दिवशी देशभरात ठिकठिकाणी रावणाचे दहन केल्या जाते, मात्र देशात एक सण असे आहे जिथे चक्क रावणाचे मंदिर आहे.

Dussehra 2022: भारतातल्या या ठिकाणी आहे रावणाचे मंदिर, फक्त दसऱ्याच्याच दिवशी असते लोकांसाठी खुले
दशासन मंदिर
Image Credit source: Social Media
Follow us on

कानपुर, आज हिंदू धर्मियांपैकी महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजेच दसरा (Dussehra 2022) आहे. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. सत्याची असत्यावर विजय म्हणून देशात ठिकठिकाणी रावणाच्या प्रतिकृतीचे  दहन करण्यात येते. रावणाला कायमच असत्याचा प्रतीक म्हणून दर्शविले जाते मात्र देशात एक असे शहर आहे जिथे चक्क रावणाचे मंदिर (Rawan Temple in India) आहे. इतकेच काय तर दसऱ्याच्या दिवशी या मंदिरात रावणाची पूजा देखील केली जाते. विशेष म्हणजे हे मंदिर वर्षातून एकदा फक्त दसऱ्याच्याच दिवशी उघडले जाते. जाणून घेऊया हे मंदिर कुठे आहे.

या शहरात आहे रावणाचे मंदिर

कानपुर शहराचे एक वेगळेपण आहे.  येथील परंपरांनी या शहराला एक वेगळी ओळख दिली आहे. या शहरात एक असे अनोखे मंदिर आहे, ज्याचे दरवाजे वर्षातून एकदाच विजय दशमीच्या दिवशी उघडले जातात. विशेष म्हणजे मंदिरात बसलेल्या मूर्तीवर दोडक्याची फुले अर्पण केली जातात.

कानपूरमध्ये दशाशन म्हणजेच रावणाचे मंदिर आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कैलास मंदिर शिवालय आहे, जिथे दशानन म्हणजेच रावणाचे देखील मंदिर आहे. हे मंदिर माता छिन्नमस्ता मंदिराच्या प्रवेशद्वारावर  आहे.

हे सुद्धा वाचा

असा आहे मंदिराचा इतिहास

असे म्हणतात की येथे एस. गुरुप्रसाद शुक्ल यांनी 155 वर्षांपूर्वी माँ छिन्नमस्ता आणि कैलास मंदिराची स्थापना केली होती. मंदिरात देवी काली, माता तारा, षोडशी, भैरवी, भुनेश्वरी, धुमावती, बगलामुखी, मातंगी, कमला महाविद्या यांच्यासह दुर्गा जी, जया, विजया, भद्रकाली, अन्नपूर्णा, नारायणी, यशोविद्या, ब्राह्मणी, पार्वती, श्री विद्या, देवास जगद्धात्री इत्यादी देवी विराजमान आहेत. शिव आणि शक्तीच्या मधोमध दशानन मंदिर असून रावणाची प्रतिमा बसविली आहे.

 

दसऱ्याला करतात रावणाची पूजा

 

रावण सामर्थ्यशाली होता तसेच विद्वानही होता, तो शिव आणि शक्तीचा साधक होता. रावणाला मृत्यू आणि अमरत्वाचे वरदान होते, त्याच्या नाभीत अमृत होते. प्रभू श्रीरामांनी त्यांच्या नाभीला बाणाने छेद दिला तेव्हा दशकंधर पृथ्वीवर पडला होता पण त्याचा मृत्यू झाला नाही.

भगवान श्रीरामांनी लक्ष्मणाला ज्ञान प्राप्तीसाठी रावणाकडे पाठवले. यामुळेच दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या मंदिराचे दरवाजे उघडतात आणि शक्ती, बुद्धिमत्ता, दीर्घायुष्य आणि आरोग्याचे वरदान मिळविण्यासाठी लोकं जमतात.

 

लांकेश्वराला अर्पण केले जाते दोडक्याची फुल

 

लांकेश्वराच्या दर्शनासाठी येथे दूरवरून लोकं येतात. विजय दशमीला सकाळी महादेवाला अभिषेक केल्यानंतर दशानन मंदिरात श्रृंगारासह दूध, दही, तूप, मध, चंदन, गंगाजल यांचा अभिषेक केला जातो. यानंतर महाआरती होते.

दोडक्याची फुलं अर्पण करून, अखंड सौभाग्य आणि शक्ती, बुद्धिमत्ता आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात. मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याबरोबरच लोकं फुले अर्पण करून साधना करत असत. इथे फक्त कानपूरच नाही तर उन्नाव, कानपूर देहाट, फतेहपूर इत्यादी जिल्ह्यांमधून लोकं येतात. दसऱ्याला पूजा केल्यानंतर वर्षभरासाठी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात.