Dussehra 2022: दसऱ्याच्या दिवशी करा या दोन झाडांची पूजा, शत्रूवर होईल विजय प्राप्त

| Updated on: Oct 05, 2022 | 8:57 AM

आज हिंदू धर्मातलय महत्वाच्या सणांपैकी एक असलेला सण दसरा आहे. यादिवशी दोन झाडांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.

Dussehra 2022: दसऱ्याच्या दिवशी करा या दोन झाडांची पूजा, शत्रूवर होईल विजय प्राप्त
दसरा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, आज दसरा (Dussehra 2022) आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि घरात सुख-संपत्ती येते अशी मान्यता आहे. घराच्या ईशान्य कोपर्‍यात शमीचे झाड लावणे फायदेशीर मानले जाते. घरामध्ये शमीच्या झाडाची पूजा करण्यासाठी प्रथम पूजेचे ताट तयार करून शमीच्या झाडाच्या मुळास पाणी अर्पण करावे. यानंतर झाडावर मोली बांधून रोळी-तांदूळ-हळद लावावी. यानंतर दिवा आणि अगरबत्ती लावून झाडाची आरती करावी. प्रसाद आणि नारळ अर्पण केल्यानंतर झाडासमोर डोके टेकवून प्रदक्षिणा करावी.

अपराजिता वनस्पती

अपराजिता वनस्पती दसऱ्याच्या दिवशी अपराजिताच्या झाडाची किंवा त्याच्या फुलांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. अपराजिताचे झाड किंवा फूल हे देवी अपराजिताचे रूप मानले जाते. अपराजिताची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिंदूंच्या काळाच्या विभाजनानुसार अपराजिताचा काळ. विजयासाठी अपराजिता देवीची पूजा केली जाते.

असे मानले जाते की, रावण राक्षसाचा पराभव करण्यासाठी लंकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी, विजयादशमीला भगवान रामाने देवी अपराजिताची पूजा केली होती. कोणतीही यात्रा काढण्यापूर्वी देवी अपराजिताची पूजा केली जाते कारण तिचे आशीर्वाद यात्रेचा उद्देश पूर्ण करण्यात आणि यात्रा सुरक्षित करण्यात मदत करतात.

हे सुद्धा वाचा

विजयादशमीच्या दिवशी अपराजिताच्या रोपाची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो. घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला झाड नसल्यास घरातील पूजेच्या स्थळाजवळ चंदनाचे आठ कोन एकत्रित करून मध्यभागी अपराजिताची फुले किंवा रोपे ठेवावीत. यानंतर त्याची विधिवत पूजा करून प्रार्थना करावी.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)