मुंबई : आज फाल्गुन अमावस्या (Falgun Amavashya) आहे. या दिवशी गंगा तसेच इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. या दिवशी पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा करतात. अमावस्येला पितरांच्या नावाने दान केले जाते.(Amavashya Upay) फाल्गुन हा शेवटचा महिना असल्याने या महिन्यात उपासनेला विशेष महत्त्व आहे. यावर्षी फाल्गुन अमावस्या 21 फेब्रुवारी म्हणजेच आज साजरी होणार आहे. ज्यांना या दिवशी उपवास करायचा आहे ते करू शकतात. यामुळे व्यक्तीच्या सत्कर्मात वाढ होते, ज्यामुळे जीवनात शुभता वाढते. फाल्गुन अमावस्येला भगवान शिवाची पूजा करावी. अकाली मृत्यू, भय, वेदना आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी भगवान शिवाची उपासना प्रभावी मानली जाते. जीवनातील अडचणी आणि गुंतागुंत यातून मुक्त होण्यास मदत होते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये या व्रताला अश्वथ प्रदक्षिणा व्रत म्हणतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. शनिदेवाचीही पूजा करावी. जाणून घेऊया फाल्गुन अमावस्येची तिथी, योग, महत्त्व, स्नान दानासाठी शुभ मुहूर्त इत्यादी.
अमावस्या तिथीला भगवान विष्णूची उपासना करणे आणि भगवद्कथा पाठ करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी केलेले दान आणि सत्कर्म कधीही न संपणारे फळ देतात.
या दिवशी उपासना करणे आणि उपवास करणे कुटुंब आणि मुलांच्या सुखासाठी फायदेशीर मानले जाते. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होत असेल किंवा एखाद्याच्या कुंडलीत हा दोष असण्याची शक्यता असेल तर या दिवशी विशेष पूजा आणि उपवास केल्याने या दोषापासून मुक्ती मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)