मुंबई, हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील शेवटचा महिना फाल्गुन महिना (Falgun Month 2023) असतो. म्हणूनच हिंदू धर्मात फाल्गुन महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना माघ महिन्याप्रमाणेच शुभ मानला जातो. म्हणूनच या महिन्यात स्नान आणि दान केल्याने शुभफल प्राप्त होते. भगवान शंकराव्यतिरिक्त फाल्गुन महिन्यात माता सीता, श्रीकृष्ण, माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याची प्रथा आहे. पंचांगानुसार, फाल्गुन महिना 6 फेब्रुवारी 2023, सोमवारपासून सुरू होत आहे आणि 7 मार्च 2023, मंगळवार रोजी समाप्त होत आहे. महाशिवरात्री, (Mahashivratri) फुलैरा दुज, अमलकी एकादशी, विजया एकादशीपासून होळीपर्यंतचा सण फाल्गुन महिन्यात साजरे केला जातो. जाणून घ्या फाल्गुन महिन्यात येणाऱ्या सर्व उपवास सणांची माहिती.
पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री येते. धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. यामुळे या दिवशी भगवान शंकराचा जलाभिषेक केल्यास शुभ फल प्राप्त होते.
हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा 7 मार्चला होलिका दहन आणि 8 मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार होलिका दहनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6.31 ते 8.58 पर्यंत असेल.