Falgun Month : अत्यंत शुभ असते फाल्गुन महिना, या उपायांनी पुर्ण करा मनोकामना

| Updated on: Feb 10, 2023 | 6:22 PM

भगवान शिव, श्रीकृष्ण आणि चंद्रदेव यांच्या उपासनेचा हा महिना आहे. या महिन्यात होळी, महाशिवरात्री इत्यादी प्रमुख सण साजरे केले जातात. फाल्गुन महिन्याबाबत काही नियम धार्मिक ग्रंथात दिले आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

Falgun Month : अत्यंत शुभ असते फाल्गुन महिना, या उपायांनी पुर्ण करा मनोकामना
फाल्गुन महिना
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिना (Falgun Month) हा वर्षाचा शेवटचा महिना आहे. सोमवार, 06 फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा महिना मंगळवार, 07 मार्चपर्यंत चालणार आहे. हा महिना ऊर्जा आणि तारुण्याचा महिना मानला जातो. हवामानानुसारही या महिन्यात वातावरण प्रसन्न होऊन सर्वत्र नवा उत्साह संचारतो. धार्मिक दृष्टिकोनातूनही फाल्गुन महिना अतिशय शुभ मानला जातो. भगवान शिव, श्रीकृष्ण आणि चंद्रदेव यांच्या उपासनेचा हा महिना आहे. या महिन्यात होळी, महाशिवरात्री इत्यादी प्रमुख सण साजरे केले जातात. फाल्गुन महिन्याबाबत काही नियम धार्मिक ग्रंथात दिले आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

काय फायदा होईल?

सनातन धर्मामध्ये या महिन्यात काही विशेष नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्याने झोपलेले भाग्य जागे होते. यासोबतच या महिन्यात श्रीकृष्ण, भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांची पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते. अपत्यप्राप्तीसाठीही हा महिना विशेष आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची विधिवत पूजा केल्याने निपुत्रिकांनाही संतती प्राप्त होते. या

जाणून घ्या कोणत्या देवतेची पूजा केल्याने तुमची कोणती इच्छा पूर्ण होऊ शकते.

श्रीकृष्णाच्या विविध रूपांची पूजा

फाल्गुन महिन्यात श्रीकृष्णाची उपासना केल्याने विशेष फळ मिळते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्याच्या कोणत्याही रूपाची पूजा करू शकता. अपत्यप्राप्तीची इच्छा असल्यास बालकृष्णाची पूजा करावी. प्रेम आणि शांतीसाठी मुरलीधर कृष्णाची पूजा करा आणि ज्ञान आणि वैराग्य यासाठी गीतेचा उपदेश करणाऱ्या कृष्णाची पूजा करा. त्यांच्या पूजेत सुवासिक फुलांचा वापर करा आणि महिनाभर त्यांना अबीर-गुलाल अर्पण करा.

हे सुद्धा वाचा

यांची पण करा पूजा

आरोग्यविषयक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी फाल्गुन महिन्यात भगवान शंकराची पूजा करा आणि महिनाभर त्यांना पांढरे चंदन अर्पण करा. दुसरीकडे, जर तुम्ही आर्थिक समस्यांशी झुंजत असाल तर संपूर्ण महिनाभर माँ लक्ष्मीला गुलाबाची फुले किंवा गुलाबाचा अत्तर अर्पण करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)