मुंबई : प्राचीन हिंदू संस्कृतीचे अनेक उत्कृष्ट नमुने भारतात पाहायला मिळतात. भारतात असलेले तिर्थक्षेत्र हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. प्राचिन काळापासून चालत आलेल्या येथील परंपरा या मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. या पैकीच एक म्हणजे प्राचीन तिर्थक्षेत्रातील आरती. अगदी पर्यटक म्हणूनही तुम्हाला एखाद्या वेगळ्या ठिकाणी भेट देण्याची इच्छा असेल तर भारतातील या चार ठिकाणी अवश्य भेट द्या. या ठिकाणी होणारी आरती (Famous Aarti in India) जगभरात प्रसिद्ध आहे.
भारताची गंगा आरती जगभर प्रसिद्ध आहे. हर की पौरी येथे गंगा आरती पाहण्यासाठी लाखो लोक हरिद्वारला गर्दी करतात. त्याचे दिव्य दर्शन कोणालाही भुरळ घालू शकते. गंगा आरतीचे दृश्य पाहून माणूस भक्तीच्या रसात तल्लीन होतो. गंगा आरती पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं येतात. हरिद्वारच्या धर्तीवर आता ऋषिकेश, वाराणसी, प्रयाग आणि चित्रकूटमध्ये गंगा आरतीचे आयोजन केले जात आहे. आरती पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी होते.
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आहे. महाकालच्या आरतीचे असे रूप महाकालेश्वर मंदिरात पाहायला मिळते जे इतर कोठेही सापडणार नाही. या मंदिरात भस्मारती पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात भाविकांची गर्दी होते. महाकालेश्वरमध्ये दरवर्षी शिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भस्म आरती पाहण्यासाठी देश-विदेशातील लोकं येथे येतात.
मथुरेत बांके बिहारीजींची आरती पाहून सर्वजण मंत्रमुग्ध होतात. हे मंदिर अतिशय सुंदर आणि पंचक्रोशीत खूप प्रसिद्ध आहे. येथील आरती अतिशय भव्य आणि मनमोहक आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या समोर एक दरवाजा आहे जो पडद्याने झाकलेला आहे. हा पडदा दर एक किंवा दोन मिनिटांनी बंद आणि उघडला जातो. येथील आरती पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक वृंदावनात येतात.
केदारनाथ मंदिर पर्वत आणि नद्यांनी वेढलेले आहे. अत्यंत खडतर प्रवास करून लोकं ही आरती पाहण्यासाठी येथे पोहोचतात. केदारनाथ धाम ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सकाळी शिवपिंडाला नैसर्गिकरित्या स्नान करून त्यावर तूप लावले जाते. त्यानंतर अगरबत्ती लावून आरती केली जाते. यावेळी भाविकांना मंदिरात प्रवेश करून पूजा करता येते, मात्र सायंकाळी देवाला सजवले जाते. यावेळी भक्तांना दुरूनच दर्शन घ्यावे लागते
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)