या लोकांच्या घरी करू नये जेवण
Image Credit source: Social Media
मुंबई : आपल्या घरी कोणालातरी जेवणासाठी आमंत्रित करणे किंवा घरी पाहुण्यांचे स्वागत करणे हा हिंदू धर्म आणि भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण धर्मग्रंथात भोजनाचे नियम दिलेले आहेत. यामध्ये स्वयंपाक करण्यापासून ते खाण्यापर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. यासोबतच धर्मानुसार कोणता आहार योग्य आणि कोणता अयोग्य हेही सांगण्यात आले आहे. पुराणांमध्ये महापुराणाचा दर्जा असलेल्या गरुड पुराणात (Garud Puran) काही ठिकाणी भोजन निषिद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. गरुड पुराणानुसार काही लोकांच्या घरात अन्न खाल्ल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनता. अशा ठिकाणी जेवल्याने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, व्यक्तीचे पतन होते.
या ठिकाणी कधीही खाऊ नका
गरुड पुराणानुसार काही लोकांच्या घरी अन्न कधीही घेऊ नये. कारण अन्नामध्ये ऊर्जा असते आणि त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर आणि मनावर पडतो. यामुळे नकारात्मक विचाराने बनवलेले अन्न खाऊ नये. तसेच नकारात्मक वातावरणात बसून जेवू नये. कोणाच्या ठिकाणी खाणे निषिद्ध मानले जाते यावर एक नजर टाकूया.
- क्रोधी व्यक्ती : जी व्यक्ती तापट स्वभावाची असते तिच्या घरचे अन्न कधीही खाऊ नका. त्यांच्या स्वभावामुळे वातावरणात नकारात्मकता निर्माण होते आणि त्याचा परिणाम तुमच्यासोबतच अन्नावरही होतो. अशा व्यक्तीची संगत टाळणे चांगले.
- चोरी किंवा फसवणूक करणार्याच्या घरी : चोर किंवा गुन्हेगाराच्या घरी कधीही जेवू नका. चुकीच्या मार्गाने पैसे कमावलेल्या व्यक्तीच्या घरचे अन्न खाल्ल्याने त्यांच्या पापांचा तुमच्यावरही परिणाम होऊ शकतो. असे अन्न तुमच्या बुद्धीला भ्रष्ट करू शकते. तुम्हाला गरीब करू शकतो.
- किन्नरांच्या घरी : हिंदू धर्मात तृतीय पंथीयांना दान देणे अत्यंत शुभ मानले जाते. पण त्यांना त्यांच्या घरचे अन्न ग्रहण करू नये.
- संसर्ग पसरवणारी ठिकाणे : जिथे घाण आहे किंवा कोणत्याही प्रकारचा संसर्ग पसरण्याचा धोका आहे अशा ठिकाणी अन्न कधीही खाऊ नये. जसे-हॉस्पिटल, गंभीर रुग्णाच्या आसपासची जागा इ.
- अमली पदार्थांच्या व्यवसायाशी संबंधित लोक : जे लोकं अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेले आहेत, त्यांच्या घरी कधीही काहीही खाऊ नये. असे लोकं दुसऱ्याच्या कुटुंबाला अडचणीत टाकून पैसे कमावतात. अशा लोकांच्या घरचे पाणी प्यायल्यानेही आपण पापाचे भागीदार होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)