First Shrawan Somwar 2023 : उद्या पहिला श्रावण सोमवार, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अवश्य करा हे उपाय

| Updated on: Aug 20, 2023 | 8:15 PM

उद्या म्हणजेच 21 ऑगस्टला श्रावणातला पहिला सोमवार आहे (First Shrawan Somwar 2023). यासोबतच नागपंचमीचा सणही उद्या आलेला असल्याने या दिवसाचे महत्त्व आणखीच वाढले आहे.

First Shrawan Somwar 2023 : उद्या पहिला श्रावण सोमवार, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अवश्य करा हे उपाय
महादेव
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : 17 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. भगवान शिवाला अत्यंत प्रिय अलेल्या या महिन्यात श्रावण सोमवारला विशेष महत्त्व असते. या दिवशी शिवभक्त महादेवाची भक्तीभावे पुजा करतात. उद्या म्हणजेच 21 ऑगस्टला श्रावणातला पहिला सोमवार आहे (First Shrawan Somwar 2023). यासोबतच नागपंचमीचा सणही उद्या आलेला असल्याने या दिवसाचे महत्त्व आणखीच वाढले आहे. श्रावण सोमवारी व्रत केल्याने विवाहित महिलांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. दुसरीकडे, विवाह इच्छुकांचे लग्नाचे योग लवकर जुळून येतात. सोमवारी उपवास ठेवून फलाहार केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात भाविक भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करतात. श्रावण सोमवारी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केले जातात. हे उपाय केल्याने साधकाला इच्छित फळ प्राप्त होते. तुम्हालाही भगवान शंकराची कृपा मिळवायची असेल तर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी हे उपाय अवश्य करा.

श्रावण सोमवारी अवश्य करा हे उपाय

  • जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल तर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शंकराला केशर युक्त दूध अर्पण करा. महादेवाला केशर प्रिय आहे असे मानले जाते. या उपायाने व्यावसायात आणि नोकरीत यश प्राप्त होते.
  •  करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शंकराला उसाच्या रसाने अभिषेक करा. हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. तसेच वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहतो.
  • आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर सावन सोमवारी देवांचे देव महादेवाला दूध आणि गंगाजलाने अभिषेक करा. त्यामुळे पैसा मिळण्याची शक्यता निर्माण होऊ लागते.
  • शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारी चंदनाचा लेप भगवान शिवाला अवश्य लावावा. हा उपाय केल्याने सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते.
  •  महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रावण सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. तसेच तुम्ही अन्नदानही करू शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)