Gajanan Maharaj Revealed Day 2022 ‘गण गण गणात बोते’ अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज प्रगट दिन

| Updated on: Feb 23, 2022 | 6:45 AM

23 फेब्रुवारी 1878  (23 February day special)  रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज (Gajanan Maharaj) दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले

Gajanan Maharaj Revealed Day 2022 गण गण गणात बोते अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज प्रगट दिन
shegaon-gajanan-maharaj-mandir
Follow us on

मुंबई :  23 फेब्रुवारी 1878  (23 February day special)  रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज (Gajanan Maharaj) दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने ‘आंध्रा योगुलु’ नावाच्या पुस्तकात गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. ‘गण गण गणात बोते’चा (Gan Gan Ganat Bote) गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो. गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत, असा सर्व भक्तांचा अनुभव होता. ‘गण गण गणात बोते’, हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत.

अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज
अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यात बरीच साम्य आढळते. दोघेही परमहंस सन्यासी होते. गजानन महाराज स्वामी समर्थ समाधीस्त होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली, असे अनेकांचे मत आहे. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते.

लोकमान्य टिळकांची भेट
अकोल्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य टिळकांना कैद झाली, त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की, टिळकांना शिक्षा अटळ आहे. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार, ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी ‘गीतारहस्य’ ही भगवदगीतेवर टीका लिहिली. आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी संपूर्णपणे शेगावात व्यतीत केला.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti : आयुष्यामध्ये यशाची शिखरे गाठायची असतील तर ‘या’ 5 लोकांपासून दोन हात लांबच राहा!

Rashifal : ‘या’ 3 राशींच्या लोकांच्या डोक्याचा ताप वाढण्याची शक्यता, खर्चावर लगाम ठेवा!

Vastu tips : नात्यामधील सततचे तणाव दूर करण्यासाठी बेडरूममध्ये ठेवा या गोष्टी आणि गोडवा वाढवा!