Ganesh Chaturthi 2024 Wishes : बुद्धीची देवता, सर्वांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाचे आज घराघरांत वाजत-गाजत स्वागत झाले आहे. गणेश चतुर्थीचा उत्साह फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातच असून सर्वत गणरायाच्या सेवेसाठी भरक्गण सज्ज झाले आहेत. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी आज ( शनिवार, 7 सप्टेंबर) रोजी ही तिथी आहे. गणरायाला वाजत गाजत घरी आणून, त्याची प्राणप्रतिष्ठा करून मनोभावे पूजा करण्यात येते. शक्ती, बुद्धी, समृद्धी संपत्ती यांच्या या देवतेला वंदन करीत सर्व संकटांपासून मुक्ती मिळो अशी प्रार्थना करत आशीर्वाद घेतले जातात. गणरायायाला प्रिय असणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. गणेश चतुर्थीच्या मंगलमय दिनानिमित्त आपण प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवू शकतो.
गणराय हे आपल्या भक्तांच्या मार्गात येणारे प्रत्येक विघ्न आणि अडथळे दूर करतात, म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणतात. गणेश चतुर्थीपासून गणेश उत्सवाची सुरुवात होते, बाप्पाच्या आगमनाने आपल्या आणि आपल्या प्रियजनांचे जीवन आनंदाने भरून जावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. जाणून घेऊया काही खास शुभेच्छा संदेश..
- मंगलमूर्तीच्या आगमनाने तुमचे जीवन अपार आनंदाने भरून जावो. तुमच्या घरावर आणि अंगणात सुख आणि समृद्धीचा वर्षाव होवो. रिद्धी-सिद्धी आणि शुभ लाभ घेऊन बाप्पा तुमच्या दारी येवो. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला शुभेच्छा…
- तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !
- मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला. मखर नटून तयार झाले, वाजत-गाजत बाप्पा आले. गुलाल, फुले, अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे.. गणेश चतुर्थीनिमित्त खूप खूप शुभेच्छा !गणेश चतुर्थी तुमच्या कुटुंबासाठी अनंत आनंदाचे आणि प्रेमाचे क्षण घेऊन येवो गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
- मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
- गणेश चतुर्थीचा सण तुमच्या हृदयात आणि घरात प्रेम, शांती आणि आनंद घेऊन येवो… गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
- कुणी म्हणे तुज गणपती, विद्येचा तू अधिपती, कुणी म्हणे तुज वक्रतुंड, शक्तिमान तुझी सोंड.. गणपती बाप्पा मोरया, गणेश चतुर्थीच्या भक्तीमय शुभेच्छा !
- बुद्धिदाता, सुखकर्ता, दु:खहर्ता श्रीगणेश तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्नांचं हरण करो… गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!
- सुखकर्ता, विघ्नहर्त्याचा आशीर्वाद देणारा हा हात सदैव तुमच्या पाठीशी असू दे. गणेश उत्सवासह जीवनात आनंदाची बरसात होवो. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
- विघ्नहर्त्याचे स्वागत, आनंदाचे आगमन! गणपती बाप्पा मोरया!