Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला यंदा तीन मोठे मुहूर्त, बाप्पाची प्रतिष्ठापना केव्हा करायची?

| Updated on: Sep 02, 2024 | 6:30 PM

पंचांगानूसार यंदा गणेश चतुर्थीचे तीन मोठे मुहूर्त आहेत. याचा अर्थ बाप्पाची पूजेचे शुभ मुहूर्त लक्षात घेऊन त्यानूसार प्रतिष्ठापना केव्हा करायची याचा माहिती पंचागात दिली आहे.या काळात बापाची पूजा केली तर तीन पट लाभ मिळेल.जर तुमच्या घरात बाप्पाचे आगमन होणार असेल तर बापाची प्रतिष्ठापना केव्हा करायची हे पाहून घ्या..

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला यंदा तीन मोठे मुहूर्त, बाप्पाची प्रतिष्ठापना केव्हा करायची?
Follow us on

गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजेने होत असते.बाप्पाला रिद्धी आणि सिद्धीची देवता मानले जाते. गणेश चतुर्थीला गणपतीच्या जन्मदिनी बाप्पा येणाऱ्या प्रत्येक घरात आणि मंडळात चैतन्याचे आणि मंगलमय वातावरण पसलेले असते.या दिवशी बाप्पाची केलेली पूजा खूपच फलदायी ठरते. बाप्पााच्या आगमनाने तर बच्चे मंडळी हरखून गेलेली असतात. यावेळी सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्याने या दिवशी सकाळी कोणत्यावेळी बाप्पाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करायची याची माहिती जाणून घेऊयात…

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्मदिन म्हटले जाते. 2024 मध्ये 7 सप्टेंबर शनिवारच्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.चतुर्थीची तिथी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3.01 वाजता सुरु होईल आणि ती दुसऱ्या दिवशी 7 सप्टेंबर 2024 रोजी सायं. 5.37 वाजता समाप्त होईल. श्रीगणेशाचा जन्म दुपारी झाला आहे, त्यामुळे दुपारच्या वेळ श्रीगणेशाची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जात आहे.

तीन शुभ मुहुर्त कोणते ?

गणेश चतुर्थीच्या मुहू्र्तावर अनेक शुभ योग देखील आहेत. त्यामुळे या दिवसाला अधिकच महत्व आहे. यात सर्वार्थ सिद्धी मुहूर्त देखील सामील आहे.या दिवशी सर्व ग्रहांची स्थिती चांगली असल्यानेही या काळात पूजा केल्याने त्याचे फळ देखील चांगले मिळते. हा शुभमुहुर्त 7 तारखेला दुपारी 12.34 वाजता सुरु होऊन तो दुसऱ्या दिवशी 8 सप्टेंबर रोजी सकाळी 06.03 वाजेपर्यंत असणार आहे.

या शिवाय रवि योग देखील या चतुर्थीला आहे. हा रवियोग सहा सप्टेंबर सकाळी 9.25 वाजता सरु होईल आणि सात सप्टेंबर रोजी दुपारी 12.34 वाजेपर्यंत असणार आहे. या दिवशी ब्रह्म योग देखील निर्माण होणार आहे. या मुहूर्ताच्या निर्मितीला देखील पवित्र मानले गेले आहे.

मूर्तिची प्रतिष्ठापना कधी ?

आपण जरी घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करणार असाल तर यासाठी देखील एक शुभमुहुर्त आहे. सात सप्टेंबर रोजी आपल्या घरात बाप्पााच्या मूर्तीला सात सप्टेंबरला रोजी दुपारी प्रतिष्ठापना करु शकता.हा शुभकाळ सकाळी 11.03 वाजता सुरु होऊन तो दुपारी 1.34 वाजेपर्यंत असणार आहे.म्हणजे साल 2024 च्या गणेश चतुर्थीला बाप्पाच्या प्रतिष्ठापणेचा मुहूर्त तब्बल 150 मिनिट मिनिटे असणार आहे.