नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : गणरायाच्या आगमनाने साऱ्या वातावरणात चैतन्य पसरले आहे. देशभरातच नव्हे जेथे कुठे जगभरात गणरायाचे भक्त पसरले आहेत तेथे गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात स्वागत केले जात असून आरत्यांनी वातावरण भक्तीमय झाले आहे. घरात आणि सार्वजनिक ठिकाणी जागोजागी मंडपांत बाप्पा विराजमान झाले आहेत. कुठे चंद्रयान-3 चे डेकोरेशन केले आहे तर कुठे वंदेभारत, राममंदिराचा देखावा चलत चित्रे भक्तांना आकर्षित करीत आहेत. सोशल मिडीयावरही अनेक गणपतीची आरस लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच एका बाप्पांनी लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या बाप्पाचं गोजरं रुप पाहून भक्तांच्या डोळ्याचं पारणं फिटत आहे. अशा सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोत श्रीगणेशाला फ्लाईटच्या विंडो सीटवर विराजमान झाल्याचे आपण पाहू शकता. या फोटोतील बाप्पाच्या मांडीवर एका प्लेट सजवलेली दिसत आहे. त्यात बाप्पाचे आवडते मोदक आणि लाडू ठेवलेले दिसत आहेत. गणपती बाप्पाच्या हातात एक मोदकही दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या AI फोटोच्या दर्शनाने भक्त आश्चर्यचकीत होत आहेत. या AI फोटोला सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर इंडीगो एअरलाईन्सने आपल्या indigo.6e या खात्यावरुन शेअर केले आहे.
इंडीगो एअरलाईन्सने शेअर केलेला बाप्पाचा फोटो –
इंडीगो एअरलाईन्सच्या इस्टाग्राम खात्यावर शेअर केलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, ‘बाप्पा घरी येताना.’ या फोटोला आतापर्यंत 6 लाख लोकांनी लाईक्स केले आहे. तर 1 लाख 77 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या पोस्टला 12 लाख व्हूज मिळाले आहेत. या फोटोला खूप पाहीले आणि लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत. या पोस्टवर युजर्स वेगवेगळ्या पद्धतीने बाप्पाची स्तूती करणाऱ्या कमेंट करीत आहेत. एका युजरने म्हटले आहे की ‘खूपच क्यूट’, दुसऱ्या युजरने म्हटले आहे की ‘बाप्पा मोरया’, तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की , ‘चांगले एडीट केले आहे.’