दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पांचे उद्या विसर्जन (Ganpati Visarjan) होणार आहे, उद्या अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे. हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानल्या जाते. कुठलेही शुभ विधी किंवा कार्यक्रमापूर्वी गणपतीला वंदन केले जाते. आशा या प्रथम पूजनीय गणपतीच्या उत्सवाचा उद्या शेवटचा दिवस आहे. भक्त 10 दिवस मनोभावे गणपतीची पूजा करतात आणि 11 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला विसर्जित करतात. गणपतीचे विसर्जन योग्य पद्धतीने केल्यास वर्षभर घरात समृद्धी राहते, अशी मान्यता आहे. अनंत चतुर्दशी कधी आहे आणि गणपती विसर्जनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे याबद्दल जाणून घेऊया.
राहुकालात करू नये विसर्जन
अनंत चतुर्दशीला विसर्जन शुभ मुहूर्तावरच करावे. राहुकाळात गणपती विसर्जन करू नये.
विसर्जन हा बाप्पाचा निरोपाचा दिवस. बाप्पाला थाटामाटात निरोप दिला जातो. विसर्जनासाठी लाकडी पाटावर प्रथम पिवळे किंवा लाल कापड पसरून त्यावर स्वस्तिक बनवावे. त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी. बाप्पाच्या मूर्तीची विधिवत पूजा करावी. फळे व फुले अर्पण करून मोदक मोदकाचा नैवैद्य दाखवावा. बाप्पाची आरती करावी. गणपतीची मूर्ती आणि पूजेशी संबंधित गोष्टींचे आदरपूर्वक विसर्जन करावे. यानंतर बाप्पा पुढच्या वर्षी येवो, अशी प्रार्थना करून बाप्पांना निरोप दयावा.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)