मुंबई : आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये जीवन जगण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत, ज्याचा अवलंब करून माणूस आपले जीवन बदलू शकतो. गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 पुराणांपैकी एक मानले जाते. त्याची देवता भगवान विष्णू मानली जाते. अशी अनेक माहिती गरुड पुराणात (Garud Puran) देण्यात आली आहे जी प्रत्येक मानवाने वाचली पाहिजे. याशिवाय, गरुड पुराणात असे देखील वर्णन केले आहे की माणूस स्वतःच्या जीवनासाठी जबाबदार असतो. या पुराणात जीवन जगण्याचे काही नियम देखील सांगितले आहेत आणि अशा गोष्टी देखील सांगितल्या आहेत ज्या आपण आयुष्यात कधीही करू नयेत. चला जाणून घेऊया गरुड पुराणात कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत.
स्मशानभूमीच्या धुरापासून दूर राहा – गरुड पुराणानुसार, जेव्हा स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे दहन केले जाते तेव्हा त्याच्या धुरापासून दूर राहावे. कारण मृतदेह जाळल्यावर धुरासोबत विषारी घटक वातावरणात पसरतात. या विषारी घटकांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया असतात जे जवळ उभी असलेली व्यक्ती श्वास घेत असताना शरीरात प्रवेश करतात.
सकाळी उशिरापर्यंत झोपणे- गरुड पुराणानुसार, जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल तर सकाळी उशिरा उठण्याची सवय बदला. धार्मिक शास्त्रांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर जागरण करणे चांगले मानले जाते. सकाळची हवाही शुद्ध असते, जी मानवाला अनेक रोगांपासून वाचवते.
रात्री दही खाणे- गरुड पुराणानुसार रात्रीच्या वेळी दही किंवा दह्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. रात्री दही खाल्ल्याने अनेक आजार होतात ज्याचा माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. याशिवाय रात्री मांसाहार खाऊ नये.
झोपण्याची योग्य पद्धत – गरुड पुराणात असे सांगितले आहे की दक्षिण किंवा पश्चिम दिशेप्रमाणे चुकीच्या दिशेला डोके ठेवून झोपल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते. जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत प्रवेश करता तेव्हा त्यामध्ये थोडासा प्रकाश असावा, परंतु हे लक्षात ठेवा की बेडवर झोपल्यानंतर खोली अंधारमय असावी. तसेच तुटलेल्या पलंगावर झोपणे देखील निषिद्ध आहे.
या मार्गाचा अवलंब करू नका – गरुड पुराणानुसार, चुकीच्या कृतीचे परिणाम माहित असूनही जो व्यक्ती चुकीचा मार्ग स्वीकारतो, तो पापी ठरतो. त्याच बरोबर ज्यांच्या मनात स्त्रिया, मुले आणि मानवतेबद्दल चुकीचे विचार आहेत, तर असे लोक स्वतःचे आयुष्य कमी करण्यास जबाबदार आहेत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)